विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत लोकसभेच्या 35 जागांवर एकमत आहे, असे वक्तव्य शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. याचा अर्थ उरलेल्या 13 जागांच्या वादात महाविकास आघाडीचे “बारा” वाजणार आहेत, असाच राजकीय वर्तुळात घेतला जात आहे. Consensus in Mahavikas Aghadi on 35 seats
INDI आघाडीच्या जागा वाटपाबाबत आत्तापर्यंत 5 बैठका पार पडल्या. परंतु प्रत्यक्षात जागावाटप झाले नाही. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या देखील काही बैठका झाल्या. परंतु त्यामध्ये फक्त 35 जागांवर एकमत झाल्याचे शरद पवारांनी नमूद केले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी 13 जागांवर आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे.
त्यातही ज्या जागांवर रस्सीखेच आहे, तिथले आघाडीतल्या घटक पक्षांचे इच्छुक आघाडीचे तिकीट मिळाले नाही, तर सत्ताधारी महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाकडे जाण्याची जाऊन तिकीट मिळवण्याची भीती महाविकास आघाडीतल्या नेत्यांना वाटते. त्यामुळे पवारांनी नेमक्या कुठल्या 35 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आणि कुठल्या 13 जागांवर अद्याप मतभेद आहेत आणि चर्चा सुरू आहे, याविषयी बिलकुल खुलासा केला नाही.
दक्षिण मुंबईच्या जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच झाल्याबरोबर मिलिंद देवरांनी एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली. मिलिंद देवरांचे पक्षांतर ही केवळ झलक आहे. महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या मतभेदांमुळे आणखी अशी अनेक पक्षांतरे होण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच पवारांनी चतुराईने 35 जागांवर एकमत झाल्याचे सांगितले, पण कुठल्या 13 जागांवर मतभेद आहेत, हे बिलकुलच सांगितले नाही.
त्यातही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत “एन्ट्री” मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यांना महाविकास आघाडीत “एन्ट्री” देऊन त्यांचे किती जागांवर समाधान करायचे आणि त्यासाठी महाविकास आघाडीतल्या कोणत्या घटक पक्षाने किती “त्याग” करायचा?, हे अजून ठरायचे आहे. त्यामुळेच “महाविकास आघाडीत 35 जागांवर एकमत”, एवढीच पुडी शरद पवारांनी सोडली आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App