मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच मोठा तोटा; तर ठाकरे बंधूंच्या यशात खोडा!!

Uddhav Thackeray'

नाशिक : मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच मोठा तोटा तर ठाकरे बंधूंच्या यशात खोडा!!, असे राजकीय चित्र एका निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू काही वेगळा निर्णय घेतात का??, असा सवाल देखील पुढे आला.Congress’s own strength in Mumbai is a big loss; but a setback in the success of the Thackeray brothers!

– काँग्रेसला फक्त 19 जागा

Vote vibe संस्थेने मुंबई महापालिकेच्या केलेल्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली, त्या आकडेवारीनुसार मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच जास्त तोटा होत असल्याचे स्पष्ट झाले. कारण मुंबईत काँग्रेसला स्वबळावर लढून फक्त 19 जागा मिळतील तर ठाकरे बंधूंना 79 जागांवर समाधान मानावे लागेल, असे चित्र समोर आले. त्याचबरोबर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र येऊन निवडणूक लढवली तरी त्यांचा आकडा 114 पेक्षा जास्त होणार नाही हेही दिसून आले. बाकीच्या फुटकळ पक्षांना 5 – 10 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.



– शिवसेना – भाजपला मर्यादित यश

या आकडेवारीचा अर्थ असा की काँग्रेस स्वबळावर लढून स्वतःचाच तोटा करून घेणार असून ठाकरे बंधूंच्या यशात सुद्धा खोडा घालायची शक्यता आहे. कारण 227 जागांपैकी जर भाजप आणि एकनाथ शिंदेंना निम्म्याच म्हणजे 114 जागा मिळणार असतील, तर त्यांचे बहुमत सुद्धा पूर्ण होत नाही. याचा अर्थ मत विभागणीचा फायदा त्यांना मर्यादित मिळतोय. अशा स्थितीत ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे एकत्रितरित्या निवडणूक लढले तर भाजप आणि शिवसेनेची ते यशस्वी टक्कर घेऊ शकतात. ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढले तर त्यांच्या आकड्यांमध्ये फार मोठा फरक पडू शकतो हेच राजकीय वास्तव ही सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते.

– स्वबळाचा आग्रह‌ सोडा

महापालिकेची निवडणूक ऐन मध्यावर आहे. जागावाटपाच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. स्वबळाच्या नुसत्या घोषणा झाल्या आहेत पण प्रत्यक्षात उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या नाहीत. अशावेळी ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी तडजोड करून निवडणूक लढविली, तर त्यांनाच मोठा फायदा होऊ शकेल अन्यथा स्वबळाच्या अनावश्यक आग्रहामुळे हाती येऊ शकणारी सत्ता ते गमावतील, असे सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून तरी समोर आलेय. या आकडेवारीतून व्यवस्थित अंदाज घेऊन ठाकरे बंधू आणि काँग्रेस नेमका काय निर्णय घेतात??, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेय.

Congress’s own strength in Mumbai is a big loss; but a setback in the success of the Thackeray brothers!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात