विशेष प्रतिनिधी
परभणी : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकीकडे मुंबईत काँग्रेसशी आघाडी केली असताना दुसरीकडे परभणीत मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार तोंडसुख घेतले. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणूनच त्यांचे वाटोळे झाले, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडले.
वंचित बहुजन आघाडीने मुंबईत काँग्रेस पक्षाशी आघाडी केली काँग्रेसने त्यांना तब्बल 62 जागा सोडल्या, पण वंचित बहुजन आघाडीला तेवढे उमेदवार देखील त्यांना उभे करता आले नाहीत. त्यांना फक्त 46 उमेदवार उभे करता आले. त्यामुळे तब्बल 16 जागांवर काँग्रेसची गोची झाली. काँग्रेसला 16 जागांवर अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करावे लागले.
पण प्रकाश आंबेडकर काँग्रेसची तेवढ्यापुरतीच गोची करून थांबले नाहीत. त्यांनी परभणीतून काँग्रेसवर जोरदार शरसंधान साधले. त्यामुळे काँग्रेस सगळीकडून अडचणीत आली.
– प्रकाश आंबेडकर म्हणाले :
– काँग्रेसकडे आता स्वतःचा मतदारच उरलेला नाही. जो काही मतदार उरलाय, तो मुस्लिम आहे. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणून त्यांची ही अवस्था झाली. बाबाजानी दुर्राणी यांनी खतीब यांचा फक्त वापर करून घेतला आणि आता ते काँग्रेसकडे त्या पक्षाची वाट लावायला गेलेत.
– आता काँग्रेसकडे फक्त मुस्लिम मतदार उरलेत, पण मुस्लिम मतदारांना सुद्धा माझे आवाहन आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे कारण काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले शरद पवार म्हणजेच दाऊद इब्राहिम आहेत. त्यांच्याच मुळे काँग्रेसची वाट लागली. त्यामुळे उद्याच्या व्यवस्थेत संविधान टिकावे, असे वाटत असेल, तर मुस्लिमांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App