नाशिक : नको लालू, नको ठाकरे बंधू; एकटेच लढू अन् जोरदार पडू!!, अशी काँग्रेसची भूमिका आता समोर आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी जमेनासे झाले आहे, तर मुंबईत काँग्रेसला ठाकरे बंधूंबरोबर निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रादेशिक पक्षांची फाटायला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.Congress will fight alone in Bihar and Mumbai
राहुल गांधींनी मतदान चोरीचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्यांच्याभोवती प्रादेशिक पक्षांचे नेते एकवटले होते. कारण त्यांना वेगवेगळ्या निवडणुकीत पराभवाचा फटका बसला होता. राहुल गांधींनी मतदान चोरीचा मुद्दा उचलल्या बरोबर प्रादेशिक पक्षांना त्यात रस वाटायला लागला. परंतु मतदान चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या भोवती एकवटलेले प्रादेशिक पक्षांचे नेते प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र काँग्रेस पासून फटकून वागायला लागले त्याचबरोबर काँग्रेस देखील प्रादेशिक पक्षांबरोबर खटकून वागायला लागली. याची चिन्हे बिहार आणि मुंबईतल्या निवडणुकीत दिसली.
फक्त यात्रेत एकत्र
बिहारमध्ये राहुल गांधींनी मतदार अधिकार यात्रा काढली त्यामध्ये सुरुवातीला तेजस्वी यादव सामील झाले. पण नंतर तेजस्वी यादव यांनी स्वतंत्र यात्रा काढली. विधानसभेची निवडणूक प्रत्यक्ष जाहीर झाली, त्यावेळी मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राजधानी यांची महागठबंधन नावाची आघाडी अडून राहिली. तब्बल 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राजदचे उमेदवार आमने सामने आले. कोणीही मागे हटायला तयार झाले नाही. त्यामुळे महागठबंधनची जागा वाटपाची अधिकृत घोषणा अजून होऊ शकली नाही.
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू नको
दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधूंच्या बरोबर युती करून निवडणूक लढणार नाही, असे जाहीर वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांनी करून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे परस्पर जाहीर करून टाकले.
निवडणूक आयोगाच्या दारी एकी
मतदान चोरी आणि मतदार यादी मधील घोळ या विषयावर निवडणूक आयोगाला भेटायला जाताना महाविकास आघाडी एक होती उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे निवडणूक आयोगाच्या दारी गेले होते. त्यांच्याबरोबर राज ठाकरे देखील होते. दुसऱ्या दिवशी फक्त शरद पवार शिष्टमंडळातून स्वतःहून वगळले गेले होते. पण त्यांचे प्रतिनिधी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड महाविकास आघाडी सोबत होतेच. निवडणूक आयोगाच्या दारी महाविकास आघाडीची एकजूट दिसली होती. तिच्यात राज ठाकरे यांची सुद्धा भर पडली होती.
पण प्रत्यक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढताना काँग्रेसला ठाकरे बंधूंबरोबर युती करायची इच्छा नाही. काँग्रेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या पक्षांबरोबर ही युती करणार नाही. काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे महापालिकेच्या निवडणुका लढेल, असे भाई जगताप यांनी जाहीर केले.
बिहार आणि मुंबई येथे भाजप सारखे प्रबळ सत्ताधारी आणि त्यांच्याबरोबर तगडे दोन प्रादेशिक पक्ष उभे ठाकले असताना काँग्रेसला मात्र स्वबळाची खुमखुमी आल्याची ही चिन्हे आहेत. त्यामुळे एकटेच लढू अन् जोरदार पडू!!, असेच घडण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App