प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत उरलेल्या विरोधी पक्षांमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदनिष्ठ गट यांच्या संख्याबळाच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांची संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल अशी कबुली शरदनिष्ठ गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.Congress will be the leader of the opposition; Confession of Jayant Patil
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मधले आमदार शरदनिष्ठ गटाकडे की अजितनिष्ठ गटाकडे या वादात नेमकी संख्या कोणाकडे अधिक?, याचा निर्णय होत नव्हता. तसा निर्णय अद्यापही झालेला नाही. पण जयंत पाटलांच्या कबुलीतून अजितनिष्ठ गटाकडेच राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याचे दिसून येते. त्यामुळेच विधानसभेतले विरोधी पक्षनेतेपद स्वाभाविकपणे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसकडे जाण्याची कबुली जयंत पाटलांनी दिली.
अजित दादांबरोबर शिंदे फडणवीस सरकार मध्ये जाऊन जी मंत्री झाले आहेत, ते आमदार विरोधी बाकांवर असताना शिंदे – फडणवीस सरकारलाच सर्वाधिक प्रश्न विचारात होते. आता ते त्यांच्या बाजूने गेल्याने तेच त्यांनी आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.
अजितनिष्ठ गटाचे आमदार लवकरच राजकीय वस्तुस्थिती समजतील. त्यांना शिंदे – फडणवीस सरकार काही देऊ शकणार नाही हे समजल्यानंतर ते पुन्हा एकदा शरद पवारांकडे वापस येतील, असा दावा रोहित पवारांनी केला होता. पण या दाव्याला देखील जयंत पाटलांच्या वक्तव्यातून छेद मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more