विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis काँग्रेसने कसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगासमोर आणले. त्यानंतर गोंधळलेली काँग्रेस आता देशासमोर नाटक करत आहे. काँग्रेसने कधीही आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. कॉंग्रेसला फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरुन राजकारण करायचे आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. Devendra Fadnavis
काँग्रेस अमित शाह यांच्या वक्तव्यावर आंदोलन करत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा काँग्रेसने माफी मागावी. कारण अमित शाहांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ त्यांनी वाया घालवला. संसदेत मोदींनी काँग्रेसला एक्सपोज केलं. काँग्रेस आणि त्यांचे वरिष्ठ नेते यांनी कसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला आहे हे मोदींनी जगासमोर आणले. त्यानंतर गोंधळलेली काँग्रेस आता देशासमोर नाटक करत आहे.
काँग्रेसने कधीही आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. इंदू मिल जागेवर स्मारकासाठी इंचभर जागा ही मिळाली नाही नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर 2 हजार कोटींची मोठी जमीन मिळाली. बाबसाहेबांचे लंडनचे घर आम्ही घेतले आणि बाबासाहेबांच्या स्मृतीला जपण्याचे काम केले. कॉंग्रेसला फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरुन राजकारण करायचे आहे
बीडचा पालकमंत्री पद कोण यासंदर्भात मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू. मात्र बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवर बोलतानाबोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यांपेक्षा सेफ राज्य आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर असे राजकारण करणे शोभत नाही. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. जाती-जातीत द्वेष निर्माण करायचा आहे
आणेवारी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याकडे स्टॅंडिंग आदेशच आहे, जी काही आणेवारी आली असेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App