प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारवर विशेषतः काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराज आहेत आणि त्यांनी तक्रार करण्यासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी बातमी येताच त्यावर “राजकीय उतारा” देणारी दुसरी बातमी आली आहे…!! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची ही बातमी आहे.Congress Unrest: 25 Congress MLAs angry over Congress ministers; But Nana’s “political transcript” of writing a letter to the Chief Minister
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाविकास आघाडी स्थापन होतेवेळी जो किमान समान कार्यक्रम राबविण्याचे निश्चित झाले होते, तो कार्यक्रम राबवण्याची आग्रही मागणी केली आहे.
किमान समान कार्यक्रमाच्या (सीएमपी) आधारे महाविकास आघाडीचे सरकार चालविण्याचे ठरले आहे. कोरोना संकटाचा अडसर दूर झाल्यामुळे ‘सीएमपी’नुसार दलित, आदिवासी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जावी, ही अपेक्षा, असे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अडीच वर्षे गेली वाया
काँग्रेसच्या 25 नाराज आमदारांची प्रामुख्याने नाराजी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आहे. काँग्रेसचे मंत्री आमदार यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. विविध महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. अडीच वर्षे वाया गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला निधी जास्त मिळतो. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना झुकते माप देतात. ते त्यांच्या सतत संपर्कात राहतात, अशा काँग्रेसच्या आमदारांच्या तक्रारी आहेत. या तक्रारी प्रत्यक्षात सोनिया गांधी यांना भेटून त्यांच्या कानावर घालण्याची 25 आमदारांची तयारी आहे.
किमान समान कार्यक्रमाच्या (सीएमपी) आधारे महाविकास आघाडीचे सरकार चालविण्याचे ठरले आहे. करोना संकटाचा अडसर दूर झाल्यामुळे 'सीएमपी'नुसार दलित, आदिवासी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जावी, ही अपेक्षा. pic.twitter.com/PoJL24eml5 — Nana Patole (@NANA_PATOLE) March 30, 2022
किमान समान कार्यक्रमाच्या (सीएमपी) आधारे महाविकास आघाडीचे सरकार चालविण्याचे ठरले आहे. करोना संकटाचा अडसर दूर झाल्यामुळे 'सीएमपी'नुसार दलित, आदिवासी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जावी, ही अपेक्षा. pic.twitter.com/PoJL24eml5
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 30, 2022
नानांची चतुराई
3 एप्रिल रोजी एका प्रशिक्षणाच्या निमित्ताने हे सर्व आमदार दिल्लीत जाणार आहेत. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. परंतु, नाना पटोले यांनी काँग्रेसच्या 25 आमदारांच्या नाराजीवर त्यावर कोणतेही भाष्य न करता मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून किमान समान कार्यक्रम राबवण्याची मागणी केली आहे. मूळ प्रश्नाला बगल देऊन नानांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची ही “राजकीय चतुराई” साधली आहे.
यूपीए चेअरमन पदावर पुन्हा भाष्य
त्याच वेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांच्या यूपीए चेअरमन पदावर देखील पुन्हा एकदा भाष्य केले आहे. कोणी ठराव करून कोणाला यूपीए चेअरमन होता येणार नाही. ठराव कोणता करायचा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे पण सध्या सोनिया गांधी यूपीएचे अध्यक्षपद भूषवत आहेत. काँग्रेसला वगळून कोणतीही विरोधी ऐक्याची आघाडी यशस्वी होणार नाही, असे रोखठोक उत्तर नाना पटोले यांनी दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App