विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा, शिवसेना आणि बाकीच्या पक्षांनी आपापली थीम सॉंग रिलीज केल्यानंतर काँग्रेसही या आता मागे राहिलेली नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यंदा निवडून आणणार जिंकून येणार यंदा पंजा हे थीम सॉंग रिलीज केले!!” ते गाणे काँग्रेसचे आहे, पण ब्रॅण्डिंग नानांचे झाले आहे.
पक्षाचे चिन्ह जनमानसाच्या मनामनात ठसावे यासाठी काँग्रेसने थीम सॉंगचे बोलच “यंदा पंजा” या दोन शब्दांभोवती गुंफले आहेत. यातून काँग्रेस कुठल्याही एका नेत्याचे नाव समोर आणत नाही, असा दाखला देण्याचा पक्षाचा प्रयत्न असला, तरी प्रत्यक्षात 2 मिनिटे 41 सेकंदांचे थीम सॉंग नीट पाहिले, तर त्यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेच ब्रॅण्डिंग पक्षाने आक्रमकपणे केल्याचे दिसते.
महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रचार गीत यंदा पंजा निवडून आणू ✋🏼 pic.twitter.com/terSMFmUDl — Pratik S Patil (@Liberal_India1) October 30, 2024
महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रचार गीत
यंदा पंजा निवडून आणू ✋🏼
pic.twitter.com/terSMFmUDl
— Pratik S Patil (@Liberal_India1) October 30, 2024
यातही महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रतिनिधींपेक्षा काँग्रेसचे नेतेच जास्त दिसत आहेत. त्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्राधान्य देऊन राहुल गांधींची छबी मोठ्या प्रमाणात झळकवली आहे. त्यांच्या बरोबरीने नानांची छबी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये झळकली आहे. त्यानंतर एखाद दुसऱ्या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बाकीच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांचा समावेश थीम सॉंग मध्ये केला आहे. त्यामध्ये रमेश चेन्निथला, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, नसीम खान, सुशील कुमार शिंदे वगैरे नेत्यांचा समावेश आहे, पण प्रमुख छबी राहुल गांधी आणि नाना पटोले यांचीच दिसेल याची “काळजी” थीम सॉंगच्या कर्त्यांनी आवर्जून घेतल्याचे दिसून येते.
काँग्रेसमध्ये नाना हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख स्पर्धक मानले जात आहेत. त्यांनी प्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची महाविकास आघाडी अंतर्गत पंगा घेण्याची क्षमता दाखवली. ठाकरे आणि पवारांच्या दबावापुढे नाना झुकले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पवारांच्या 85 च्या खोड्यात अडकून न पडता पक्षाने 102 उमेदवारी जाहीर करता आले. काँग्रेस हायकमांडने सध्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. “यंदा पंजा” या थीम सॉंग मधून नानांचे ब्रॅण्डिंग झाल्याचे हे खरे इंगित आहे. यातून अप्रत्यक्षपणे काँग्रेसने ठाकरे आणि पवारांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App