महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून ठिणगी; काँग्रेस – शिवसेनेचे दावे परस्पर विरोधी; पवार पेचात आणि तोट्यात!!

Congress - shivsena lock horns over chief ministerial candidate of MVA

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वासाने एकत्रितरित्या सामोरे जाण्याऐवजी मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरच महाविकास आघाडी ठिणगी पडली आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांनी परस्परविरोधी दावे करून महाविकास आघाडीला किंबहुना शरद पवारांना पेचात आणि तोट्यात आणले आहे. कारण महाविकास आघाडी तुटली, तर काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळकट येईल. उद्धव ठाकरेंचा महायुतीमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होईल, पण शरद पवारांचा पक्ष मात्र एकटा पडून तोट्यात जाण्याची शक्यता आहे. Congress – shivsena lock horns over chief ministerial candidate of MVA

लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सच्या आधारे काँग्रेसने महाविकास आघाडीत जागा वाटपात वर्चस्व राखण्यासाठी आघाडीतून कोणत्याही एका व्यक्तीचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करायला नको, असा आग्रह धरला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हजर होते. त्याचबरोबर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील तिथे उपस्थित होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा कोणताही एक चेहरा नको, असे असा आग्रह या बैठकीतच महाराष्ट्रातल्या नेत्यांनी धरला आणि त्याला मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी देखील दुजोरा दिल्याची बातमी समोर आली.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेची स्वतंत्र भूमिका मांडली. महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांच्या संघर्षामुळेच यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आणूनच महाविकास आघाडीने एकत्रितरित्या उतरले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघून महाविकास आघाडीला मतदान झाले. त्यामुळे महाराष्ट्रात देखील बिन चेहऱ्याने निवडणुकीला सामोरे जाण्यास मतलब नाही. महाराष्ट्राची जनता बिन चेहऱ्याचे सरकार स्वीकारणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

काँग्रेस आणि शिवसेना यांच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली. या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आगीत झाले, तर उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे स्वतंत्र लढतील किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष महायुतीमध्ये सामील होऊन अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडावे लागेल, काँग्रेस तर स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवून संघटनात्मक ताकदीवर जास्तीत जास्त जागा मिळवून मिळवण्याचा प्रयत्न करेल.

पण ह्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकाकी पडण्याची दाट शक्यता आहे. भले अजित पवारांचा पक्ष फुटेल किंवा अजित पवारांना राजकीयदृष्ट्या शरद पवारांपुढे शरण जावे लागेल, तरी देखील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस या संघर्षात एकाकीच पडलेली दिसण्याची शक्यता आहे.

Congress – shivsena lock horns over chief ministerial candidate of MVA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात