काँग्रेसच्या व्यापक मुस्लिम संपर्काची धास्ती म्हणून पवारांची भूमिका मुस्लिम धार्जिणी जास्ती!!

महाराष्ट्रात शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट समाजात औरंगजेब प्रेम उफाळले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजांना धोका असल्यामुळे त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे, असे जे वक्तव्य केले, त्यातून पवारांची जास्तीची मुस्लिम धार्जिणी भूमिका अधोरेखित झाली आहे. Congress reach out to pasmanda muslims real trouble for NCP in maharashtra, therefore pawar increased muslim appeasement

बॉम्बस्फोटाच्या वेळची भूमिका

अर्थात पवारांची मुस्लिम धार्जिणी भूमिका ही बाब महाराष्ट्रासाठी नवीन नाही. 1992 च्या बॉम्बस्फोटाच्या वेळी मुंबईत 12 नव्हे, 13 बॉम्बस्फोट झाले. त्यातला 1 बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाला, असे पवार जाहीरपणे खोटे बोलले होते. पवार त्या खोटे बोलण्याचे आजही समर्थन करतात. हिंदू – मुस्लिम समाजामध्ये तेढ उत्पन्न होऊ नये. कारण १२ बॉम्बस्फोट हे फक्त हिंदू वस्तीत झाले होते. त्यामुळे तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत “घडविणे” भाग होते, असा पवारांचा त्यावेळी दावा होता आणि आजही तो कायम आहे. यामागे पवारांची मुस्लिम धार्जिणी भूमिकाच कारणीभूत आहे.

पण आता भूमिकेत मूलभूत अंतर

पण मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी पवारांनी घेतलेली मुस्लिम धार्जिणी भूमिका आणि आत्ता 7 जून 2023 रोजी घेतलेली मुस्लिम धार्जिणी भूमिका यात मूलभूत अंतर आहे, ते म्हणजे पवार 1992 च्या बॉम्बस्फोटाच्या वेळी महाराष्ट्राचे केवळ मुख्यमंत्रीच नव्हते, तर ते अखंड काँग्रेसचे महाराष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे नेते होते. पण आता तशी अवस्था नाही. आता पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळा पक्ष आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे होऊन त्यांची स्वतंत्र वाटचाल सुरू झाल्याला 25 वर्षे होत आली आहेत. पण तरीदेखील मुस्लिम धार्जिणे धोरण हा दोन्ही पक्षांमधला एक समान धागा आहे.



त्यातही एक विशिष्ट बारकावा बघितला, तर काँग्रेस मुस्लिमांविषयी जेव्हा अनुकूल भूमिका घेते, तेव्हा त्याची पुरेपूर राजकीय किंमत वसूल करते. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकात दिसले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवताना काँग्रेसने देवेगौडांच्या जेडीएसची जी 5 % मते स्वतःकडे खेचली, ती बहुसंख्येने मुस्लिमांची मते होती आणि त्याचा लाभ काँग्रेसला भाजप पेक्षा दुप्पट जागा मिळवण्यात झाला.

काँग्रेसचा पसमांदा मुस्लिम संपर्क

पण हे झाले कर्नाटक पुरते. त्यापलीकडे जाऊन काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अल्पसंख्यांक संपर्काचा एक मोठा रोड मॅप तयार केला आहे, त्या रोड मॅपची पवारांना खऱ्या अर्थाने धास्ती आहे. कारण त्या रोड मॅप नुसार काँग्रेस सुमारे 100 लोकसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम मतांवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. काँग्रेस पसमांदा अर्थात मागास मुस्लिमांशी विशेषत्वाने संपर्क प्रस्थापित करणार आहे आणि हाच नेमका पवारांना राष्ट्रवादीसाठी राजकीय धोका वाटतो आहे. कारण महाराष्ट्रातली सर्वच्या सर्व सुमारे 10 ते 12 % मुस्लिम मते काँग्रेसने स्वतःकडे खेचली, तर राष्ट्रवादीच्या मतांचा टक्का एवढा मोठ्या प्रमाणावर घसरेल की काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा निवडणूक परफॉर्मन्स कित्येक पटीने खाली उतरेल, ही खरी भीती आहे!!

या संघर्षात काँग्रेस आणि भाजप अशी जरी टक्कर असली, तरी प्रत्यक्षात स्वतःच्या मतांची टक्केवारी वाढवताना काँग्रेस प्रादेशिक पक्षांची मते खेचते ही वस्तुस्थिती कर्नाटकात दिसली आहे.

काँग्रेसशी टक्कर राष्ट्रवादी साठी अवघड

अर्थात राष्ट्रवादी देखील आत्तापर्यंत काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडूनच राजकीय दृष्ट्या पुष्ट होत आली आहे. त्यामुळे काँग्रेस एक प्रकारे स्वतःच्याच मतांचा वाटा परत स्वतःच्या खात्यात वळवण्याची चिन्हे दिसत आहेत. पण त्यात जर काँग्रेस दलित, मुस्लिम आणि ओबीसी मधला मतांचा वाटा वाढविण्यात यशस्वी झाली, तर ती राष्ट्रवादीसाठी राजकीय कंबख्तीच ठरेल. कारण राष्ट्रवादी एकट्या मराठा मतांच्या टक्क्यावर काँग्रेसला देऊन – देऊन टक्कर तरी किती देईल??, हा खरा प्रश्न आहे!!

राजकीय मेख

त्यामुळे काँग्रेसचा पसमांदा मुस्लिमांशी वाढता संपर्क हा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणारा विषय आहे आणि इथेच पवारांच्या जास्तीच्या मुस्लिम धार्जिण्या धोरणाची खरी “राजकीय मेख” दिसून येते. काँग्रेस जास्त मुस्लिम धार्जिणी की राष्ट्रवादी जास्त मुस्लिम धार्जिणी ही पवारांनी एक प्रकारे न बोलता स्पर्धाच लावली आहे. कारण राष्ट्रवादीचा मुस्लिम मतांचा टक्का कमी झाला, तर राष्ट्रवादी पुन्हा एकदा “बॅक टू स्क्वेअर वन” म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फेकली जाण्याची धोका आहे. या दृष्टिकोनातून विचार केला, तर पवारांच्या ताज्या जास्तीच्या मुस्लिम धार्जिण्या भूमिकेचा उलगडा होऊ शकेल. ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.

Congress reach out to pasmanda muslims real trouble for NCP in maharashtra, therefore pawar increased muslim appeasement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात