विशेष प्रतिनिधी
अमरावती : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या केलेल्या भाववाढीने दोन-तीन मोजक्या मोठ्या व्यापाऱ्यांना मदत होत असून गरीब सामान्य माणसांच्या आटोक्याच्या बाहेर गेले असल्याचा आरोप करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.Congress protests against inflation in Amravati
संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनता विविध पातळीवर अत्यंत त्रस्त आहे. तसेच या दरवाढीमुळे सामान्य जनतेस कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. या परिस्थितीसुद्धा केंद्रातील भाजपा सरकारने मूठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी देशातील जनतेला रस्त्यावर आणून ठेवलेले आहे.
देशात बेराजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तरी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही केंद्रातील शासनास निवेदन करतो की, महागाई आटोक्यात आणून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावती येथे केली.
महागाईच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App