विशेष प्रतिनिधी
अहमदनगर: विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजपचे १२ आमदार निलंबित केल्यानंतर महाविकास आघाडीत कौतूक झालेल्या तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांच्या महत्त्वाकांक्षेचा फुगा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टाचणी लावून फोडून टाकला. congress not set aside its claim over maharashtra assembly speaker post, says balasaheb thorat
विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून कामाचे कौतूक झाल्यानंतर भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाचे वेध लागले असतील, तरी त्यांनाच ते पद दिले पाहिजे असे काही नाही. काँग्रेसकडे विधासभा अध्यक्षपदावर काम करण्यासाठी सक्षम नेते आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भास्कर जाधव यांच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घातली.
तालिका अध्यक्षपदाच्या कामगिरीचे फक्त महाविकास आघाडीतच कौतूक झाल्यानंतर भास्कर जाधव यांची महत्त्वाकांक्षा फुलून आली. शिवसेनेने विधानसभेचे अध्यक्षपद हे आपल्याकडे घ्यावे, असेही जाधव यांनी म्हटले, त्याला पुष्टी म्हणून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले वनमंत्रीपद काँग्रेसला द्यावे आणि त्या बदलत्यात विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेने घ्यावे, अशीही शिवसेनेत भास्कर जाधवांच्या प्रेरणेतून मागणी सुरू झाली. यासंबंधी विचारले असता बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, की तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांनी या अधिवेशनात चांगलेच काम केले असले तरी त्यांनाच विधानसभेचे अध्यक्षपद द्यावे, असे काही नाही. काँग्रेसमध्ये असे सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आलेले आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार झालेला नाही. अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया असल्याने आणि कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये, यासाठी वातावरण निवळल्यावरच ही निवडणूक घ्यावी लागणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
थोरात यांच्या अशा स्पष्टोक्तीनंतर भास्कर जाधव यांच्या फुललेल्या महत्त्वाकांक्षेचा फुगा फुटल्यात जमा असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App