नाशिक : मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते पोहोचले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेते पदासाठी त्यांना घातले साकडे!! महाराष्ट्राचे राजकारण काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांच्या हातातून निसटल्याचे चिन्ह या भेटींमधून दिसले.Congress leaders meet chief minister Devendra fadnavis
एकेकाळी काँग्रेस नेत्यांचा रुबाब
एकेकाळी सगळ्या महाराष्ट्राचे राजकारण एकट्या काँग्रेस पक्षाने हलविले होते. कारण महाराष्ट्रावर त्यावेळी काँग्रेसचे संपूर्ण वर्चस्व होते. त्यावेळच्या विरोधी पक्षांचे नेते एखादे पद मिळते का किंवा एखादे काम होते का, हे पाहण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या दारात खेटे घालायचे. काँग्रेसच्या नेत्यांच्या हातातले बाहुले जाण्याचा आरोप सहन करायचे. काँग्रेस नेत्यांच्या नावाची सेना झाल्याचे हिणकस मान्य करायचे. मग काँग्रेसचे नेते कधीतरी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर राजकीय कृपा करून त्यांचे एखादे काम करायचे किंवा त्यांना एखादे पद द्यायचे. ही अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात किमान 40 वर्षे होती.
काँग्रेसच्या नेत्यांचे मातोश्रीला साकडे
पण आता महाराष्ट्राचे राजकारण 360 अंशात फिरून गेले. काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांच्या हातात काहीही उरले नाही, याची चिन्हे गेल्या 30-35 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने दिसत होती. ती आता ठळक दिसायला लागलीत. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि अमिन पटेल काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. तिथे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. महापालिका आणि जिल्हा परिषद आणि निवडणुकांमध्ये आघाडी करण्याविषयी सकारात्मकता दाखविली. पण काँग्रेसच्या नेत्यांची मुख्य मागणी विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेते पदाची होती. ते शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे होते. पण दानवे निवृत्त झाल्यानंतर ते परत काँग्रेसच्या सतेज पाटलांना मिळावे, यासाठी शिवसेनेने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मागणीला नेमका कसा प्रतिसाद दिला, हे शिवसेनेने जाहीर केले नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली.
नंतर फडणवीसांची भेट
उद्धव ठाकरे यांना काल मातोश्रीवर भेटून आल्यानंतर बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि अमिन पटेल हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज भेटले. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या नेत्याला द्यावे. लोकशाहीच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते पद भरणे उचित ठरेल. त्यामुळे सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. सरकार लवकरच विरोधी पक्ष नेते पदाचे पद भरेल, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. कारण काँग्रेस नेत्यांच्या हातात त्यापेक्षा दुसरी काही नाही.
कारण सरकार सकारात्मक असेल आणि सरकारची इच्छा असेल तरच ते पद भरले जाईल. कारण विरोधकांकडे त्या पदावर हक्क सांगण्यासाठी आवश्यक असलेले आमदारांचे संख्याबळ नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते पद भरणे हे सरकारच्या राजकीय कृपेवरच अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App