काँग्रेसच्या नाना टीमची नियुक्ती होताच उखाळ्या-पाखाळ्या ना सुरूवात; पृथ्वीराज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून नाराज

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भरभक्कम आहे. 18 उपाध्यक्ष 65 सरचिटणीस आणि बरीच काही पदे काँग्रेस श्रेष्ठींनी भरली आहेत. यामध्ये अर्थातच नव्या जुन्यांचा संगम म्हणत प्रदेश काँग्रेस मधल्या सर्व नेत्यांना सामावून घेण्यात आले आहे.congress leaders in maharashtra dismay over appiontment of former CM prithviraj chavan as congress diciplinery committee

नव्या नेत्यांमध्ये जुन्या दिवंगत नेत्यांच्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार धीरज देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव सुशील शिवराज चाकूरकर यांचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांना प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे, तर धीरज देशमुख आणि सुशील चाकूरकर यांना सरचिटणीस नेमण्यात आले आहे.



पण यातली सगळ्यात वादग्रस्त नियुक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ठरली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे त्यावरून काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजी आहे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून बंडखोरी करणाऱ्या जी 23 गटातले नेते आहेत त्यामुळे ज्यांनी स्वतःलाच शिस्तभंग केला त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन खोचक ट्विट अनेकांनी केली आहेत.

शिवाय प्रदेश कार्यकारणी प्रदेश कार्यकारणीत नेत्यांच्याच मुलांची अधिक वर्णी लावल्याने पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते देखील दुखावले गेले आहेत. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

अशा स्थितीत काँग्रेस पक्षात एकजूट दिसण्याऐवजी कार्यकारिणीतील नियुक्तीच्या निमित्ताने पक्षांमध्ये वेगवेगळे गट आता समोरासमोर उभे ठाकल्याची चिन्हे दिसत आहेत. जुन्याच काँग्रेस संस्कृतीनुसार हे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढताना दिसत आहेत.

congress leaders in maharashtra dismay over appiontment of former CM prithviraj chavan as congress diciplinery committee

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात