नाशिक : काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!, हे राजकीय चित्र मुंबईतून आज समोर आले.Congress leaders appropriately recognised Sharad Pawar’s game in Mumbai
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वबळावर लढवायची घोषणा केली, पण मुंबईतल्या काही काँग्रेस नेत्यांना मध्येच महाविकास आघाडीचा कळवळा आला म्हणून खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे मुंबईतले काही नेते शरद पवारांना “सिल्वर ओक” मध्ये जाऊन भेटले.
– काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा
शरद पवारांनी ही संधी बरोबर साधली. त्यांनी काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा घातला. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी टिकवायची असेल, तर मनसेला सुद्धा बरोबर घेतले पाहिजे, अशी सूचना त्यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना केली. काँग्रेसला ही सूचना रुचणार नाही हे शरद पवारांना पक्के माहिती होते. परंतु तरीसुद्धा महाविकास आघाडीत काडी टाकण्याच्या दृष्टीने पवारांनी काँग्रेसला मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याची सूचना केली.
– मुंबईत पवारांची नाही ताकद
वास्तविक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत काहीच ताकद नाही. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत राहिला किंवा महाविकास आघाडीच्या बाहेर पडला, तरी मुंबईत कुठल्याच राजकीय पक्षाला फार मोठा फरक पडणार नाही. पण काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांना ज्येष्ठतेचा मान देऊन राजकीय चूक केली. त्यामुळे पवारांना काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा घालण्याची संधी मिळाली.
– काँग्रेसच्या नेत्यांनी ओळखला पवारांचा डाव
पण काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांचा हा राजकीय डाव बरोबर ओळखला. पवारांना काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवू द्यायची नाहीय. काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा घालायचा आहे आणि परस्पर भाजपचा फायदा करून द्यायचा आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांच्या व्यवस्थित लक्षात आले. म्हणूनच काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांनी पवारांच्या सूचनेवर प्रति डाव टाकला. काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना बाजूला करून काँग्रेस बरोबर युती करण्याची “ऑफर” दिली. या डावपेचातून काँग्रेसच्या नेत्यांनी एकाच बाणात दोन पक्षी मारले. त्यांनी शरद पवारांच्या मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता तर लावल्याच, पण त्याचबरोबर ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा पाचर मारून ठेवली. त्यामुळे महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासारखे कितीही मोठे “चाणक्य” असले, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडीतली अंतर्गत लढाई पहिल्या फेरीत तरी जिंकली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App