विशेष प्रतिनिधी
अकोला : Hidayat Patel काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा (ता. अकोट) येथे एका प्रार्थना-स्थळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारीला दुपारी घडली. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर, मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.Hidayat Patel
गावातील राजकीय पूर्व वैमनस्यातून एका गटाकडून हा हल्ला झाल्याचे ग्रामस्थ व पोलिसांचे म्हणणे आहे. भाजप अल्पसंख्याक सेलचे दिवंगत कार्यकर्ते मतीन पटेल यांच्या गटाने पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने हा हल्ला केला. याप्रकरणी उबेद पटेलला एलसीबी पथकाने पणज येथून ताब्यात घेतले.Hidayat Patel
काकाच्या हत्येचा बदला
२४ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन शेरखाँ पटेल (५८) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशातून हिदायत पटेल यांच्यावर मृत मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती गावातील काही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आमचा त्या दिशेने तपास सुरू आहे, असे अकोट पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App