विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Mahavikas Aghadi महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आलीय भावी मुख्यमंत्र्यांची बहीण मोठी यादी; पण आम आदमी पार्टीने सारली उद्धव ठाकरे यांच्या नावाची काडी!!Mahavikas Aghadi
त्याचे झाले असे :
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची चाहूल लागताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांची भली मोठी यादी तयार व्हायला लागली. त्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर वगैरेंचे नावे समाविष्ट व्हायला लागली. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या मुलींनी त्यांचा “भावी मुख्यमंत्री” म्हणून प्रचार सुरू केला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भावी मुख्यमंत्री म्हणून उभे राहिले.
या सगळ्या स्पर्धेत शरद पवार मात्र आपल्या मनातले नाव मनातच ठेवून राहिले. पण त्यांचे मराठीमाध्यमांमधून पवारांच्या मनातल्या नावाच्या पुड्या सोडत राहिले.
पण महाविकास आघाडीत एकही जागा न घेता सामील झालेल्या आम आदमी पार्टीने मात्र मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत काँग्रेसच्या किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याचे नाव न घेता उद्धव ठाकरेंचे नाव टाकून दिले. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करावे म्हणजे आघाडीतली स्पर्धा कमी होईल. जनतेसमोर मुख्यमंत्री पदासाठी एक दमदार चेहरा पुढे करता येईल. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा दावा केला.
त्याच वेळी त्यांनी हरियाणातले उदाहरण दिले. हरियाणा मध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री बऱ्याच चेहरा जाहीर केला नाही. त्याचा काँग्रेसला तोटा झाला. काँग्रेस मधले सगळे गट आपापले आमदार निवडून आणण्यासाठी आणि समोरच्या गटातले उमेदवार पाडण्यासाठी कामाला लागले. परिणामी सगळी काँग्रेसच स्थिती पराभूत झाली. तसे महाराष्ट्रात व्हायला नको, असा टोला संजय सिंह यांनी महाविकास आघाडीला हाणला.
काँग्रेसकडे भावी मुख्यमंत्र्यांची मोठी यादी तयार होत असताना आम आदमी पार्टीने उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केल्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची स्पर्धा ऐन निवडणुकीत वाढली आणि त्यातून मोठा संभ्रम तयार होऊ लागला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App