विशेष प्रतिनिधी
नागपूर : Vadettiwar मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी ताेडगा काढल्यानंतर आता ओबीसींना भडकावत आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देण्याची तयारी काॅंग्रेसने केली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय रंग देत आहेत. स्वतःच्या पक्षीय हितासाठी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजप व शिंदे गटाकडून केली जाते.Vadettiwar
नागपुरातील रवी भवन येथे शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक झाली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो. हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. याविरोधात लढा देण्यासाठी २५ प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार आहे.Vadettiwar
वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. पण, नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपसूकच दूर होईल. ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे. २७ टक्के आरक्षणातून १३ टक्के आधीच वजा होते. उरलेल्या १९ टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे. कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App