काँग्रेस – दोन्ही राष्ट्रवादी श्रीमंत मराठ्यांचे पक्ष, संभाजीराजेंच्या भूमिकेतही सातत्य नाही; आंबेडकरांचे टीकास्त्र!!

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : सगळेच पक्ष वंचित बहुजन आघाडीला हे आमचे नव्हेत म्हणतात. दोन्हीकडून आम्हाला बाजूला सारतात पण वंचितला भाजपची बी टीम म्हणतात. हे दुटप्पी राजकारण आहे. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष म्हणूनच महाराष्ट्रात उरले आहेत. संभाजीराजे यांच्या देखील भूमिकेत सातत्य नाही, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरात सोडले. Congress – Both nationalist parties of rich Marathas

भाजपने लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव केला. मग आम्ही त्यांची बी टीम कशी??, अशी विचारणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. मराठा आरक्षणावर त्यांनी सर्वच पक्षांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी आता केवळ श्रीमंत मराठ्यांचे पक्ष म्हणूनच उरले आहेत. भाजप, शिवसेना भूमिका स्पष्ट करत नाहीत. भाजप झुंजी लावून इतर कसे लढतात हे बघत बसला आहे. सगेसोयरे आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सगेसोयरे आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण देखील टिकणार नसल्याने योग्य सल्ला घेऊन हे काम केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राज्यातील तिसऱ्या आघाडी बाबत ते म्हणाले, हा प्रयोग यशस्वी विभागवार केल्यास शक्य आहे. दुर्दैवाने राजू शेट्टी याचा विचार करत नाहीत. संभाजीराजे छत्रपती हे देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहात नसल्याने आम्ही त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाही, असे आंबेडकर यांनी सुनावले. राज्यात कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. बदल निश्चित असला तरी या त्यांच्या तोंडावर दंगली का होत आहेत??, असा सवाल त्यांनी केला.

Congress – Both nationalist parties of rich Marathas

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात