नाशिक : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एकत्र लढून महायुती वर मात करून दाखविली, पण लोकसभेचे निकाल 100 % टक्के शरद पवारांच्या कॅल्क्युलेशनुसार लागले नाहीत. उलट महाराष्ट्राच्या मतदारांची सहानुभूती ठाकरे + पवारांना दिसली, पण प्रत्यक्षात लोकसभेच्या जागा मात्र काँग्रेसच्या वाढल्या. लोकसभेच्या जागांच्या हिशेबात 14 खासदार निवडून आणून काँग्रेसने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला. महाविकास आघाडीत ठाकरे पवारांच्या पक्षांना मागे सारले.Congress becomes no. 1 party in maharashtra, now manoj jarange targets Congress
लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली. ती विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात प्रतिबिंबित होण्याची चिन्हे दिसू लागताच शरद पवारांना अनुकूल ठरणारे मनोज जरांगे कार्ड ऍक्टिव्ह झाले. मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांचे नाव घेऊन विधानसभा निवडणुकीतत सगळे काँग्रेसचे उमेदवार पाडण्याचा इशारा दिला.
महायुतीतील घटक पक्षांना विशेषतः भाजपला आणि त्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायमचा धडा शिकवण्याचा मनोज जरांगे यांचा इरादा आहे. देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या राजकारणाला पूर्णपणे छेद देतात हे लक्षात घेऊन पवारांनी “बफर” म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग करून घेतला. त्याला विशिष्ट “बळ” दिले. त्याचे “फळ” लोकसभा निवडणुकीमध्ये मर्यादित अर्थाने पवारांना मिळाले, पण पवारांची लोकसभेतली ताकद सिंगल डिजिट पेक्षा जास्त वाढली नाही आणि वाढलेल्या ताकदीचा लोकसभेमध्ये सरकार बदलणे अथवा सरकारला अडचणीत आणणे या दृष्टीने ही फारसा उपयोग नाही.
शरद पवारांचे मूळ टार्गेट हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुका होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली राहो अथवा अखंड राहो, आपला प्रभाव हा सरकारवर असला पाहिजे किंबहुना सरकार आपल्या “ताब्यात” असले पाहिजे, हा शरद पवारांचा इरादा आहे. हा इरादा साध्य करण्यासाठी पवारांना महाराष्ट्रातला पहिला नंबरचा पक्ष बनण्याची गरज आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांचा हा हिशेब काही प्रमाणात चुकला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटल्याने त्यांना सहानुभूती जरूर मिळाली. परंतु, दोघांच्याही पक्षांना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जागांवर समाधान मानावे लागले. सहानुभूती ठाकरे + पवारांना आणि मते काँग्रेसला!!, असे चित्र निर्माण झाल्याने काँग्रेसच्या लोकसभेतल्या जागा वाढल्या आणि काँग्रेसचा आणि काँग्रेस महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्याच स्पर्धेत जिंकण्याची पवारांची गरज तयार झाली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या वक्तव्याकडे पाहिले पाहिजे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आत्ता मराठा आरक्षण किंवा त्या संदर्भात फारसे कुठले विधान केले नव्हते, तरी देखील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणा विरोधात बोलू नका. मराठा समाजा विरोधात बोलू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडू, असा इशारा दिला.
सुरुवातीला मनोज सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर महायुतीतले घटक पक्ष आहेत, त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेतच, पण आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना मागे सारल्याने काँग्रेस आता मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App