62 विरुद्ध 9 : मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित आघाडीला ठरविली पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा सहा पट भारी; निवडणुकीच्या राजकारणात पवारांची किंमत घसरली!!

नाशिक : मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले. Congress and VBA

एकीकडे शरद पवारांनी बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम घेतला असताना दुसरीकडे मुंबईत काँग्रेसने अशी काही खेळी केली, की ज्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी सहा पट भारी ठरली. पवारांनी कितीही स्वबळाच्या गमजा मारल्या, तरी मुंबईत आणि बाकीच्या महाराष्ट्रात कुठल्याच पक्षाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आघाडी किंवा युतीसाठी साधे विचारले सुद्धा नाही.

– वंचितला 62 जागा तर राष्ट्रवादीला फक्त 9 जागांची ऑफर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईत काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला फक्त 9 जागा देऊ, असे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्या उलट काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करणे पसंत केले. त्यांना मुंबईतल्या 227 पैकी 62 जागा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर केली. त्यामध्ये वंचितला 62 जागा दिल्याचे त्यांनी सांगितले. उरलेल्या 150 ते 155 जागा काँग्रेस आणि मित्रपक्ष लढतील असे सुद्धा त्यांनी जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीने स्वतः लढवणारे वॉर्ड सुद्धा जाहीर केले.

– पवारांच्या राष्ट्रवादीला जमालगोटा

पण या सगळ्यात काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार जमालगोटा दिला‌. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजितदादांच्या राष्ट्रवादीने तर आधी गंडवलेच, पण काँग्रेसने सुद्धा हिंग लावून विचारले नाही. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकमेव आधार उरला, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा 16 पेक्षा एकही जागा जास्त मिळणार नाही, असे सांगून पवारांच्या राष्ट्रवादीला दुसऱ्यांदा वाटण्याच्या अक्षता लावल्या. पवारांच्या राष्ट्रवादीने एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवायचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे किमान 35 जागांची मागणी केली. दोन्ही पक्षांनी त्यांना निम्म्यापेक्षाही कमी जागा देऊ केल्या. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात पवारांची राजकीय किंमत किती घसरली आहे, याची प्रचिती आली.

एकेकाळी सगळ्या महाराष्ट्राचे राजकारण आपण बोटावर हलवतो असा गमजा मारणाऱ्या पवारांना आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी खोपच्यात घातले.

Congress and VBA dumps Sharad Pawar NCP in mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात