नाशिक : सरन्यायाधीशांवरच्या बूट फेकीला देऊन राजकीय हवा काँग्रेस आणि पवारांचे नेते पोळ्या भाजताहेत पाहा!!, असला प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांपासून ते राजधानी नवी दिल्लीपर्यंत दिसून आला. तीन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर 72 वर्षीय वकील राकेश भूषण यांनी भर कोर्टात बूट फेकला. त्यामुळे देशभर मोठी खळबळ उडाली. संपूर्ण देशभरातून राकेश भूषण यांचा सार्वत्रिक निषेध झाला. सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलने राकेश भूषण यांच्यावर कारवाई केली. परंतु, खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राकेश भूषण यांच्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर पोलीस तक्रार दाखल केली नाही.Congress and Pawar leaders making political noise by throwing shoes at the Chief Justice!!
पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना फोन करून झालेल्या प्रकाराबद्दल निषेध आणि संताप व्यक्त केला. परंतु, सरन्यायाधीशांनी अतिशय प्रगल्भतेने हे प्रकरण हाताळल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी समाधान व्यक्त केले. या सगळ्या प्रकारात सरन्यायाधीश भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि घटनात्मक पदे भूषविणाऱ्या सर्व नेत्यांनी मोठी राजकीय आणि सामाजिक प्रगल्भता दाखविली. त्यांनी आकारण विषय वाढविला नाही.
बूट फेकीच्या प्रकरणाला राजकीय हवा
परंतु महाराष्ट्रात काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी त्याचबरोबर देशात indi आघाडीतले घटक पक्ष हे राजकीय पोळी भाजल्या वाचून राहिले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, तृणमूळ काँग्रेस द्रविड मुन्नेत्र कळघम या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी देशात जणू काही राज्यघटना बुडाली, असा आव आणला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या 5 – 7 शहरांमध्ये आंदोलने केली. त्यामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी भाग घेतला.
युट्युबर्स स्कॅनर खाली
याच दरम्यानच्या काळात सरन्यायाधीशांवर बूट फेकणारे वकील राकेश भूषण यांनी माफी मागायला नकार दिला. त्यांच्या बाजूने बोलणारे youtubers सरकारच्या चौकशीच्या स्कॅनर खाली आले. अजित भारतींना ताब्यात घेण्यात आले. परंतु नंतर सोडून देण्यात आले. त्याचवेळी भारतातल्या लिबरल गॅंगने नेहमीप्रमाणे indi आघाडीची साथ दिली. बूट फेकीच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रगल्भता दाखवून आम्ही तो सगळा प्रकार विसरलो आहोत, असे वक्तव्य केले. झालेल्या प्रकाराने आम्हा सर्व न्यायाधीशांना धक्का बसला होता, पण आता तो प्रकार आम्ही विसरून गेलो आहोत, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.
निलेश लंके यांची कथित गांधीगिरी
पण बूट फेकीच्या प्रकाराला indi आघाडीतल्या घटक पक्षांनी विसरू दिले नाही. उलट त्यांनी त्या प्रकाराला राजकीय हवा दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके हे वकील राकेश भूषण यांच्या घरी गेले. त्यांना त्यांनी राहुल गांधी हातात घेतात, ती लाल राज्यघटना दिली. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिला. वकील राकेश भूषण चुकले याची जाणीव त्यांना करून द्यायला आलो होतो, अशी मखलाशी खासदार निलेश लंके यांनी केली. महाराष्ट्रातल्या लिबरल माध्यमांनी त्याच्या मोठमोठ्या बातम्या केल्या. एरवी निलेश लंकेच्या संसदेतल्या भाषणाच्या बातम्या दुर्लक्षित करणारी लिबरल माध्यमे यावेळी जोरकसपणे पुढे आली आणि निलेश लंके यांनी जणूकाही फार मोठी क्रांती घडवली आहे अशा थाटात त्यांनी राकेश भूषण आणि निलेश लंके यांच्या बातम्या दिल्या. प्रत्यक्षात तो बूट फेकीच्या प्रकरणातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार होता. पण महाराष्ट्रातल्या लिबरल माध्यमांनी बातम्यांमध्ये तसे नमूद केले नाही. उलट त्यांनी झाल्या प्रकाराची भलामण केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App