नवी मुंबई डेटा सेंटर हब’ला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महापारेषण प्रलंबित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.Chief Minister Fadnavis
यासोबतच पालघर येथे जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करण्याचे, वाढवणच्या दृष्टीने टीबीसीबी प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करण्याचे तसेच ‘नवी मुंबई डेटा सेंटर हब’ला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला न जूमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधिक्षकांनी पोलिस सरंक्षण उपलब्ध करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांचे काम गतीने पूढे नेण्याची खबरदारी घेण्याचे देखील त्यांनी यावेळी आदेश दिले.
राज्यात वीजेची वाढीव मागणी लक्षात घेता सर्व क्षेत्रांना आवश्यक वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे असून कामांची अमंलबजावणी अधिक गतीमान करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बभालेश्वर-कुडुस, शिक्रापुर-रांजणगाव, जेजुरी-हिंजवडी, पडघे-वाडा आणि कोलशेत-वाडा, विशविंद-भेंडा, बभालेश्वर-राजूरी-अहिल्यानगर एमआयडीसी, बोईसर(एमआयडीसी)-डहाणू, पडघे वाडा, नागेवाडी-भोकरदन, डहाणू सुर्यानगर एमएमआरडीए आणि कावदास जव्हार, धानोरा यावल ते चोपडा, उमरेड-नागभीड, या वीज वाहिन्यांच्या कामांबाबत आढावा घेतला. ट्रान्समिशन नेटवर्क विस्तार योजना 2024-34 अतंर्गत ₹1,54,522 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 86,656 सर्किट किलोमीटर लांबीचे नवीन ट्रान्समिशन कॉरीडॉरची कामे करण्यात येणार आहेत. या संदर्भातील कामांच्या नियोजनाबाबत विभागाच्या अपर मुख्य सचिव यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार दिलीप वळसे पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App