Amit Thackeray : ठाकरे गटाची मनसेविरोधात तक्रार, दीपोत्सव म्हणजे आचारसंहितेचा भंग, कार्यक्रमाचा खर्च अमित ठाकरेंच्या निवडणूक खर्चात टाकावा

Amit Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amit Thackeray  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सवाला नियमबाह्य परवानगी देत आचारसंहिता भंग करण्यात आल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांनी केली आहे. तसेच या कार्यक्रमाला महिण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित असल्याने या कार्यक्रमाचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरण्यात यावा, अशी देखील मागणी अनिल देसाई यांनी केली आहे.Amit Thackeray

मनसेच्या या दीपोत्सवाची तक्रार अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे केली आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा केला. याला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीच्या विरोधात देखील अनिल देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे.



खासदार अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेत मनसेच्या या दीपोत्सवाप्रकरणी निवेदन देत तक्रार दाखल केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात माहीम विधानसभेचे मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित होते, त्यामुळे सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

काय आहे तक्रारीत?

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून ‘दीपोत्सव’ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे. नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याचे म्हणत संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

Complaint of Thackeray group against MNS, election expenses of Amit Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात