वृत्तसंस्था
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुवारी इंटरनेटवर सुरू असलेल्या बनावट जाहिरातींमध्ये आपले नाव, फोटो आणि आवाज वापरल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे गुन्हा दाखल केला आहे. आपले नाव, प्रतिमा आणि आवाज वापरून लोकांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. एवढेच नाही तर या बनावट जाहिरातींमध्ये दावा केला जात आहे की, सचिन तेंडुलकरचे प्रोडक्ट विकत घेतल्यावर तुम्हाला सचिनचा स्वाक्षरी असलेला टी-शर्ट मिळेल. सचिन तेंडुलकरच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.Complaint from Sachin Tendulkar in cyber cell regarding use for advertisement, fraud case filed against unknown person
मिळालेल्या माहितीनुसार, सचिनच्या स्वीय सहाय्यकाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, 5 मे रोजी फेसबुकवर एका तेल कंपनीची जाहिरात पाहिली, ज्यामध्ये तेल कंपनीने तेंडुलकरचा फोटो वापरला होता आणि त्या उत्पादनाची शिफारस स्वतः सचिन तेंडुलकरने केली, असे लिहिले होते. तेंडुलकरच्या पर्सनल असिस्टंटच्या तक्रारीनुसार, इन्स्टाग्रामवरही अशाच प्रकारच्या जाहिराती पाहण्यात आल्या आहेत.
Access to trustworthy products is essential. Use the platform's reporting and blocking tools to keep our communities safe. Let's be proactive in creating a safer online environment. pic.twitter.com/JZR1FZTJtj — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 12, 2023
Access to trustworthy products is essential. Use the platform's reporting and blocking tools to keep our communities safe. Let's be proactive in creating a safer online environment. pic.twitter.com/JZR1FZTJtj
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 12, 2023
गुन्हा दाखल
‘सचिन हेल्थ डॉट इन’ असे नाव असलेल्या वेबसाईटवरून सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा वापर करत फार्मास्युटिकल उत्पादनांची जाहिरात केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्याव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 500 (बदनामी) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, तेंडुलकरच्या एका सहाय्यकाने गुरूवारी पश्चिम विभागीय पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली.
तक्रारीत काय म्हटले आहे?
तक्रारदाराने सांगितले की, त्याला एका फार्मास्युटिकल कंपनीची ऑनलाईन जाहिरात आली, ज्यात सचिन कंपनीव्या उत्पादन लाइनला मान्यता देत असल्याचा दावा केला होता. त्यांना sachinhealth.in ही वेबसाईट सापडली, ज्याने तेंडुलकरचे छायाचित्र वापरून या उत्पादनांची जाहिरात केली.
या तक्रारीत असे म्हटले आहे की, सचिन कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्र वापरण्याची परवानगी दिली नाही. सचिनची प्रतिमा डागाळत असल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App