महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षण मिळते की नाही हे तपासण्यासाठी युजीसी मार्फत नॅक कमीटीद्वारे महाविद्यालयांची तपासणी केली जाते. आता याच धर्तिवर प्राथमिक शाळांचीही तपासणी केली जाणार आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे – महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षण मिळते की नाही हे तपासण्यासाठी युजीसी मार्फत नॅक कमीटीद्वारे महाविद्यालयांची तपासणी केली जाते. आता याच धर्तिवर प्राथमिक शाळांचीही तपासणी केली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्या नुसार या समितिचे अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद असणार आहे. तसेच शांतिलाल मुथा फाऊंडेश समिती या साठी लागणारी सॉफ्टवेअर यंत्रणा तयार करत आहे.Colleges infrastructure and education standard check by NAAC now school Infrastructure and quality of education cheking by State School Standards Authority
नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करणे गरजेचे आहे. या साठी केंद्र शासनातर्फे स्टार्ट प्रकल्पाअंतर्गत तरतुद मंजुर केली आहे. त्या नुसार नवी प्रणाली विकसीत करण्याची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक संशोधन आणि शैक्षणिक प्रशिक्षण परिषदेची राहणार आहे. केंद्राच्या नॅक कमीटीच्या धर्तीवर शाळांचीही तपासणी करण्यासाठी शाळा मानक प्राधिकरण काम करणार आहे.
याची प्रशासकीय यंत्रणा तयार, शाळांच्या मानांकनासाठी निकष निश्चिती, सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने शांतिलाल मुथा फाऊंडेशनची मदत घेतली असून त्यानुसार कारवाई सुरु आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात राज्यशासनाला अहवाल सादर करण्यासाठी कमीटी स्थापन करण्यात आली आहे, येत्या काही दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे.
या बाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आम्ही राज्य शासनाच्या सुचनानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी समिती गठित केली असून या बाबतचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर करणार आहोत. या नंतर ही समिती गठित करुन त्यानुसार राज्यातील शाळांची मानांकर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App