राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे त्याचवेळी पवसाचीही शक्यता आहे. निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वार्यांचा प्रवाह वाढला आहे. Cold conditions prevailed in the state and rain is also expected from tomorrow
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे त्याचवेळी पवसाचीही शक्यता आहे. निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वार्यांचा प्रवाह वाढला आहे.
राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. तर उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 ते 14 नोव्हेंबर या तीन दिवसांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.
बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव शहरात (11 अंश सेल्सिअस) झाली. तर पुणे शहरात 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वार्यांमुळे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सर्वसाधारणपणे 1 ते 3 अंश सेल्सिअसने घसरले होते. अगदी दिवसादेखील थंडी जाणवत होती. परंतु, दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह आसपासच्या राज्यांत मुसळधार पाऊस बरसत आहे. उत्तरेकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले. त्यामुळे थंडीचे प्रमाण थोडे कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App