अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू : ​​​​शिवसेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल

प्रतिनिधी

मुंबई : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरुवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली. Code of conduct for Andheri East Assembly by-elections in force Shiv Sena’s Rituja Latke vs BJP’s Murji Patel

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  • निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)
  • नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 14 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)
  • नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार)
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार)
  • मतदानाचा दिनांक 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार)
  • मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार)
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार).
  • या पोटनिवडणुकीसाठी 1 जानेवारी 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे.

शिंदे गटाचा उमेदवार नाही

पोटनिवडणूक लढवण्याची तयारी शिंदे गटानेही केली होती. मात्र, आता ही जागा भाजपकडे गेली आहे. यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाकडून ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजप निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाला आहे. भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटनही झाले आहे.

Code of conduct for Andheri East Assembly by-elections in force Shiv Sena’s Rituja Latke vs BJP’s Murji Patel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात