प्रतिनिधी
मुंबई : मध्यंतरी शिवसेना आमदारांची ना राजा मंत्र्यांची अस्वस्थता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय कार्ड ऍक्टिव्हेट झाले असून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांच्या शिवसेनेला वगळणाऱ्या कामांना चाप लावला आहे आहे. CM’s political card activated for Shiv Sena
काही दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. त्यात आमदारांनी ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास या खात्यांकडून निधीवाटपात कसा दुजाभाव केला जातो, याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती.
आमच्या मतदारसंघातील कामांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री परस्पर निधीवाटप करतात. त्यासंबंधी निर्णय घेताना आम्हाला विचारातही घेतले नाहीत, अशा तक्रारी केल्या. शिवसेना आमदारांना निधी दिला जात नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या मर्जीतील कंत्राटदार, पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते यांना निधी देतात, हे आकडेवारीनिशी सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिवसेना आमदारांना डावलून देण्यात आलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.
या बैठकीला संबंधित खात्याचे सचिव आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना याविषयी जाब विचारला. मंत्र्यांनी मंजुरी दिली म्हटल्यावर आम्हाला काही करता येत नाही, असे म्हणत संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती दिल्याचे समजते.
– शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना
मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना पक्षाच्या आमदारांची कामे गतीने व्हायला हवीत. पण अनेक ठिकाणी आपल्या आमदारांची कामे रखडतात. ती कामे मार्गी लावण्यासाठी मी लक्ष घालतोच आहे. पण तुम्हीही त्यासाठी पुढाकार घ्या. पालकमंत्री व संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांतील शिवसेनेच्या आमदारांची कामे मार्गी लावण्याची जबाबदारी मंत्र्यांनी आपापसात घ्यावी असे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्र्यांना दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App