विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना फैलावाची स्थिती गंभीर आहे. एक – दोन दिवस मी परिस्थिती पाहीन आणि मग संपूर्ण लॉकडाऊन करायचे की नाही, याचा विचार करीन, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिला. CM uddhav thackeray warns complete lockdown within two – three days
मुख्यमंत्री म्हणाले…
तज्ज्ञ सल्लागार तयार झालेत
“आपण कात्रीत सापडलो आहोत. अर्थचक्र चालवायचंय, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय. मधल्या काळात अनेक तज्ज्ञ सल्ले देत आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका हा नियम नको. करोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊनऐवजी आरोग्यव्यवस्था वाढवा. मी ते सगळं करतो, पण किमान रोज ५० डॉक्टर, कर्मचारी यांचा पुरवठा महाराष्ट्रात होईल, याची सोय करा. फक्त फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल होत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App