विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मराठी – अमराठीच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आपले तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठी व अमराठी माणूस सुरक्षित आहे. इथे कोणताही वाद नाही. काहीजण या प्रकरणी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मराठी जनता त्यांना निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखवेल. त्यामुळे दुबे यांनी या प्रकरणी कोणतीही विधाने करून नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.CM Fadnavis
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राज व उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल असे वादग्रस्त विधान भाजप आमदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सोमवारी याविषयी बोलताना त्यांना असे काहीही न बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, निशिकांत दुबे यांनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. येथील परिस्थिती हँडल करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. इथला मराठी व अमराठी माणूस सुरक्षित आहे. सगळे एकमेकांसोबत योग्यप्रकारे राहत आहेत. महाराष्ट्रात मराठी व अमराठी असा कोणताही वाद नाही. काहीजण मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांना मराठी जनता व अमराठी जनता निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला दुबेंना असा असेल की, या विषयात त्यांनी कोणतेही वक्तव्य करू नये.CM Fadnavis
मुंबई मनपावर महायुतीचीच सत्ता येईल
मुंबई महापालिकेवर आमचीच सत्ता येईल असे म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. राज ठाकरेच काय, मुंबईतील छोट्यातील छोटी पार्टीही असे म्हणू शकते. आमचे रामदास आठवले साहेबही म्हणतात. आता ते आमच्यासोबत आहेत. पण ते वेगळे लढले असते तर त्यांनीही मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा लागणार असल्याचा दावा केला असता. पण आता त्यांचा झेंडा आमच्यासोबतच लागणार आहे. त्यामुळे जो पक्ष चालवतो त्याला तसे म्हणण्याचा अधिकार आहे. मुंबईत कोण सोबत येते कोण सोबत येत नाही यासंदर्भात मला काही म्हणायचे नाही. मुंबईच्या लोकांनी आपले मत बनवले आहे. मुंबई महापालिकेत महायुतीच निवडून येईल, असे फडणवीस म्हणाले.
डीनर डिप्लोमसी करा किंवा लंच डिप्लोमसी काही होणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला. या दौऱ्यात उद्धव काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांनी डीनर डिप्लोमसी करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी. नंतर लंच डिप्लोमसी करावी. कितीही डिप्लोमसी केली, तरी जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील, तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाहीत.
परिणय फुकेंच्या विधानाचे समर्थन
भाजप आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच आहे असे वादग्रस्त विधान केले आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी फुके यांनी काहीही चुकीचे विधान केले नसल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले आहे. या वादासाठी त्यांनी माध्यमांनाच दोष दिला आहे. अलीकडच्या काळात वाक्य कापून – कापून दाखवणे व त्याच्यावर दिवस काढणे हे जे आपण सुरू केले आहे ते बंद करा. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. कोणत्याही गोष्टीचे श्रेय आईला जाते आणि त्यात काही चुकले ते बापावर जाते या संदर्भात ते बोलत होते. भंडाऱ्यात शिवसेनेचे लोकं काही झाले तरी माझ्यावर टाकतात, त्यामुळे मी बाप आहे का? असे विधान केले होते. त्यांचे विधान संपूर्णपणे पाहिले असता त्यात काहीही चुकीचे वाटत नाही. त्यांचा विधानातून मी शिवसेनेचा बाप आहे असा कोणताही अर्थ निघत नाही. त्यामुळे वाक्य अर्धवट कापून ते दाखवण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, असे मुख्यंमत्री म्हणाले.
माधुरी हत्तीच्या मुद्यावर उद्या बैठक
फडणवीस यांनी यावेळी कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या मुद्यावर निर्माण झालेल्य आंदोलनावरही भाष्य केले. नांदणी व कबुतरखान्याच्या विषयावर मी उद्या बैठक बोलावली आहे. हे दोन्ही निर्णय आमचे नव्हे तर कोर्टाचे आहेत. पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यातून काही मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी आम्ही काही अभ्यासही केला आहे. उद्या काही प्रमुख लोकांशी आमची चर्चा होणार आहे. या चर्चेतून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.
आव्हाडांना सनातन, हिंदुत्वाची काहीच माहित नाही
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन दहशतवादाविरोधात केलेल्या विधानावरही भाष्य केले. जितेंद्र आव्हाड यांना सनातन किंवा हिंदुत्वाविषयी काहीच माहित नाही. त्यांना कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. ते केवळ मतांचे राजकारण करत अशी विधाने करतात. त्यांच्या विधानांना मी उत्तर देणे हे मी माझ्या लेव्हलचे समजत नाही, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App