CM Fadnavis : राज ठाकरेंच्या शंकांना नक्की उत्तर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लहान मुले पळवण्याविषयी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देण्याची ग्वाही दिली आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण यापूर्वीच सविस्तर आकडेवारी दिली आहे. पण त्यानंतरही त्यांच्या काही शंका असतील तर त्याला नक्की उत्तर दिले जाईल, असे ते म्हणालेत.CM Fadnavis

राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्यांवर व लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात चर्चा करण्याचेही आवाहन केले. पत्रकारांनी आज याविषयी मुख्यमंत्र्यांना छेडले असता त्यांनी वरील उत्तर दिले.CM Fadnavis



राज ठाकरेंच्या शंकांना उत्तर देणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांनी पाठवलेले पत्र मी अद्याप वाचले नाही. पण बेपत्ता होणाऱ्या मुली किंवा मुलांच्या संदर्भात मी यापूर्वीही आकडेवारीसह त्याची कारणे दिली आहेत. त्यातील परत किती येतात हे देखील मी सांगितले आहे. महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की, समजा एखादी मुलगी घरी झालेल्या भांडणामुळे गेली आणि 3 दिवसांनी परत आली तरी आपण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतो. त्यामुळे अशा तक्रारींची संख्या आपल्याला वाढलेली दिसते.

याविषयी आपला अंदाज असा आहे की, वर्षभराचा विचार केला तर 90 टक्क्यांहून जास्त मुले व मुले शोधली जातात. तसेच पुढील दीड वर्षात उर्वरित मुले परत येतात किंवा सापडतात. पण त्यानंतरही राज ठाकरे यांच्या काही शंका असतील तर त्यावर नक्कीच उत्तर दिले जाईल.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही दिले उत्तर

दुसरीकडे, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिले मला माहिती नाही. पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत. मी या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की जेव्हा लहान मुले हरवतात. तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष तपास योजना राबवतो. या विशेष मोहिमांच्या दरम्यान हे लक्षात येते की अनेकांच्या मिसिंग तक्रारी दाखल नसतानाही त्यांना आपण शोधून काढले आहे.

अशा घटना घडतात तेव्हा 90 टक्क्यांपेक्षा जास्त मुले सापडतात. त्यातील काही मुले हे स्वत:हून निघून गेलेली असतात किंवा आणखी काही वेगळ्या कारणांनी गेलेली असतात. यातील 90 टक्के मुले पुन्हा सापडतात. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही उरलेल्या 10 टक्के मुलांना शोधत नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गांभीर्याने लक्ष दिले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत. हा विषय नक्कीच गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विविध उपाययोजना राबवलेल्या आहेत.

आत्ता पाहू काय राज ठाकरेंचे पत्र जशास तसे

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही…

लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?

यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?

आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !

असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

CM Fadnavis Reply Raj Thackeray Missing Children Gangs Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात