विशेष प्रतिनिधी
नागपूर :CM Fadnavis मुंढवा जमीन प्रकरणात कुणालाही वाचवण्याची सरकारची भूमिका नाहीये. जो दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही उच्च न्यायालयाला देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.CM Fadnavis
महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या मतभेदावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र लढणार आहोत. आमच्यात काही राडा नाही काही रोडा नाही. एकनाथ शिंदे आमचे नेहमीच कौतुक करत असतात आणि मी देखील त्यांचे कौतुक करत असतो. आम्ही मित्रच आहोत आणि दिलखुलास मित्र आहोत.CM Fadnavis
अभिमन्यू पवारांनी योग्य मुद्दा मांडला होता, माझा गैरसमज झाला
मंगळवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना झापले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, झापले हा शब्द वापरणे चुकीचे ठरेल. खरे म्हणजे काल अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला. कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं. त्याच्यापुर्वी कोणीतरी एका प्रकरणात लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून मी त्यावर बोललो होतो. त्यानंतर अभिमन्यू पवारांनी असे म्हटले होते की लाडक्या बहिणीचे पोरं ही अवैध दारूकडे जात आहेत आणि माझ्या ऐकण्यात वेगळे आले होते आणि म्हणून मी त्यावर आक्षेप घेतला आणि लाडक्या बहीणींवर बोलू नका असे म्हटले होते. त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता, माझा गैरसमज झाला होता, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत असतील तर पोलिस काय करत आहेत?
आरवीमध्ये काल ड्रग्सचा साठा सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली. परंतु तिथले स्थानिक आमदार सुमित वानखेडे यांनी पोलिसांवर टीका केली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागले. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा त्या ठिकाणी सापडत असेल तर तिथले पोलिस ते नेमके काय करत आहेत हा प्रश्न निर्माण होतो जो वानखेडे यांनी उपस्थित केला आहे. यावर चौकशी केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर काय म्हणाले फडणवीस?
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर जो काही बिबट आला होता तिथे आणि जो काही हल्ला झाला त्याबद्दल आमची सहवेदना आहे. बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावावर वनविभागाने काम सुरू केले आहे. जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षा जो शेतात जन्माला आलेला बिबट आहे हा शहरात जास्त येत आहे. या बिबट्यांना पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये नेले जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App