विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर :CM Fadnavis सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.CM Fadnavis
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज कोपरगाव मधील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानाच्या देशातील पहिल्या CNG अर्थात क’कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सी.एन.जी.) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युएल्रकल्पाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.CM Fadnavis
सीबीजी (CBG) प्रकल्पातून दुहेरी लाभ
पेट्रोल, डिझेल आणि कोळशावर आधारित ऊर्जेचे स्रोत देशाला परकीय चलन खर्च करायला लावतात आणि कृषी क्षेत्रावर मोठे संकट आणतात. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना चालना देणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जेच्या वापरामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, आता कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) हा ऊर्जा स्त्रोतांच्या परिवर्तनातील सर्वात मोठा बदल असेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
‘सर्क्युलर इकॉनॉमी’चे मॉडेल
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सीबीजी प्रकल्पाला ‘सर्क्युलर इकॉनॉमी’चा प्रकल्प म्हटले आहे. या संकल्पनेनुसार, साखर निर्मितीनंतरचा स्पेंट वॉश, स्पेड मड आणि नेपियर ग्रास यासारखा सेंद्रिय कचरा (ऑरगॅनिक कचरा) जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रक्रियेतून मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड तयार करून तो शुद्ध करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) मध्ये रूपांतरित केला जाईल. शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळणारे उप-उत्पादन म्हणजे पोटॅश, जे बायोफर्टिलायझर म्हणून वापरले जाईल. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हित साधले जाईल आणि कोणतीही वस्तू वाया जाणार नाही, असे ते म्हणाले.
पेट्रोलसह परकीय चलनाचीही बचत
या प्रकल्पाची क्षमता आणि त्याचे फायदे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, येथील प्रकल्पामधून दररोज ७५ मेट्रीक टन सीबीजी गॅस तयार होणार आहे. या माध्यमातून देशाचे १ लाख १० हजार लिटर पेट्रोल वाचणार आहे. यामुळे मोठे परकीय चलनही वाचेल आणि पर्यावरणाचा नाशही टळेल. शिवाय, तयार होणाऱ्या पोटॅशमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील खतांसाठी करावी लागणारी आयात मोठ्या प्रमाणात कमी होईल. कचऱ्यातून आता देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असून, नैसर्गिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना चालना देण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. या नवीन विचाराचे प्रणेते विवेक कोल्हे आहेत, असे त्यांनी सांगितले.
नवनवीन प्रयोगासाठी केंद्र मदत करणार
पोटॅश आयात आणावे लागायचे ते आता गरज पडणार नाही. कारण शेतकरी आता ऊर्जादाता होणार आहे. ही पंतप्रधान मोदीजींची दूरदृष्टी आहे. आम्हाला असे नवनवीन प्रयोग करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले, असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App