प्रतिनिधी
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली. तसेच या आगीच्या घटनेमागील कारणे शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. CM Eknath Shinde visited Jindal company fire spot in nashik and also visited hospitals
या वेळी बंदरे व खनिकर्म मंत्री पालकमंत्री तथा दादाजी भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल हेदेखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेथे जिंदाल कंपनीच्या आगीची घटना समजताच त्यांनी सिल्लोड दौरा आटोपून नाशिकला येण्याचा निर्णय घेतला. नाशिक मध्ये येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App