मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : राष्ट्रवादीवर क्वचित वार; पण अचूक प्रहार!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : विधिमंडळाचे नागपुरातले हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक विशिष्ट राजकीय कौशल्य समोर आले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विविध भाषणांचा सूर पाहिला, तर तो आपण गद्दार नाही. आपण बाळासाहेबांच्या विचारांचे, हिंदुत्वाचे वारस आहोत, असे सांगण्याचा राहिला आहे. एक प्रकारे शिवसेनेतून फूट पाडून आपण बाहेर का पडलो?, या विषयीचे खुलासे एकनाथ शिंदे यांनी वारंवार केले आहेत. पण त्या पलिकडे जाऊन एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर क्वचितच वार केले आहेत. पण जे वार केले आहेत, ते अचूक प्रहार असल्याचेही सिद्ध झाले आहे. CM Eknath Shinde rarely targets NCP leaders, but whenever he targets, it’s a perfect punch

 अजितदादा – जयंत पाटील संघर्षावर प्रहार

उदाहरणेच द्यायची झाली, तर सरकार बदलल्यानंतर ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस विरोधी पक्षात गेले, त्यावेळी संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते पद द्यायची वेळ आली, त्या विरोधी पक्षासाठी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या राजकीय संघर्षाचा एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतल्या भाषणात अचूक उल्लेख केला होता. एकनाथ शिंदे म्हणाले होते, जयंतराव विरोधी पक्षनेते तुम्हाला व्हायचे होते. पण झाले अजितदादा. अजितदादाच दादा आहेत. दादा की दादागिरी चलेगी!! जयंत पाटील यांना विधानसभेतले विरोधी पक्ष नेते व्हायचे होते, पण अजितदादा विरोधी पक्षनेते झाले. किंबहुना राजकीय भीतीपोटी राष्ट्रवादीला अजितदादांना मुख्य विरोधी पक्षनेते करावे लागले, हा अचूक प्रहार त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला होता.

– धनंजय मुंडेंवर “करुणा” प्रहार

असाच अचूक प्रहार एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील विधानसभेतच केला होता. शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी धनंजय मुंडे यांनी जे आवेश पूर्ण भाषण केले होते, त्याचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे म्हणाले होते, की धनंजय मुंडे यांनी त्यांचा घसा खराब होईपर्यंत जोरात भाषण केले. जणू काही ते किती वर्षांचे शिवसैनिक आहेत. पण त्यांचाही सगळा इतिहास मला माहिती आहे. त्यावेळी देवेंद्रजींनी दया, करुणा सगळं दाखवलं. पण दरवेळी तसे करता येणार नाही, असा सणसणीत इशारा देऊन एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा मुंडे प्रकरणाची आठवण करून देऊन अचूक प्रहार केला होता.


विरोधकांचे बाउन्सर्स, गुगली वगैरे; पण अद्याप सरकार ना बीट, ना विकेट!!


– पवारांवर लवासा प्रहार

नागपूर मध्ये हिवाळी सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीवर असाच अचूक प्रहार केला आहे. ठाकरे – पवार सरकारने त्यांच्या अखेरच्या दिवसात मंजूर घाईगर्दीत मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना शिंदे – फडणवीस सरकारने चाप लावला. या मुद्द्यावर अजितदादांनी पत्रकार परिषदेत तीव्र आक्षेप घेतला. मात्र एकनाथ शिंदे यांनी अजितदादांचा आक्षेप खोडताना आमदनी अठन्नी खर्चा रुपया असला प्रकार आधीच्या सरकारने केल्याचा उल्लेख करून लवासाचा अचूक प्रहार केला. आमच्या सरकारला महाराष्ट्रात लवासा घडवून आणायचा नाही, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी लवासात प्रकल्पाचे अपयश अधोरेखित केले आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना डिवचले.

– सरकारच्या आक्रमणाची चुणूक

पण हे नुसते डिवचणे नसून संपूर्ण हिवाळी अधिवेशनात शिंदे – फडणवीस सरकार विरोधकांचे हल्ले कशाप्रकारे आक्रमकपणे परतवू शकते याची चुणूकही एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दाखवून दिली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे क्वचितच राष्ट्रवादीवर वार केले आहेत, पण जे वार केले आहेत, ते अचूक प्रहार ठरले आहेत, हे मात्र यातून दिसून येते.

CM Eknath Shinde rarely targets NCP leaders, but whenever he targets, it’s a perfect punch

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात