प्रतिनिधी
मुंबई : सिडकोने दिवाळीनिमित्त नागरिकांना मोठी भेट दिली आहे. सिडकोने 7849 परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. ही सर्व घरे नवी मुंबई विमानतळाच्या परिसराजवळच आहेत. सिडकोकडून जाहीर करण्याच आलेल्या लॉटरीचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना होणार आहे. CIDCO’s Diwali Gift; 7849 Affordable Housing Lottery; Registration from Diwali Padwa
या घरांच्या लॉटरीसाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवार २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
घरे कोणत्या भागात?
सिडकोने 7849 घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. ही घरे नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व २, ए २ बी आणि पी ३, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ- उरण रेल्वे मार्गाजवळ आहेत.
गृहसंकुलाची वैशिष्ट्ये
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात आलेली घरे उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज आहेत. या गृहसंकुलाच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा नागरिकांना मिळतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही ३ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या सदनिका उपलब्ध असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App