चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chitra Wagh उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सौगात ए मोदी या उपक्रमावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपकडूनही उद्धव ठाकरेंना जोरदार पलटवार केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.Chitra Wagh
चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, ‘’उद्धव ठाकरे तुम्ही त्या तुष्टीकरणाच्या राजकारणात इतके बरबटले आहात की तुम्हाला सावरकरांचाही विसर पडला. काय म्हणाले होते सावरकर… हिंदू म्हणजे कोण? तर हिंदू म्हणजे, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू.’’
‘’त्यामुळेच आम्ही दिवाळीला जसा आनंदाचा शिधा देतो. तसंच पंतप्रधानांनी सौगात-ए -मोदी दिलं तर ठाकरे घाबरले वाटतं? आम्ही कायम म्हणतो की आम्हाला हिंदुंत्वाचा सार्थ अभिमान आहे… हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे देखील म्हणाले होते की, गर्व से कहो हम हिंदू है… त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत पण तुमंच काय…?’’
‘’उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्त्व आठवलं नाही? वक्फ बोर्डाच्या सुधारित बिला विरूध्द तुमचे नेते मतदान करतात तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्त्व? या देशाच्या १४० कोटी जनतेला आपलं कुटुंब मानणाऱ्या… वसुधैव कुटुंबकम् म्हणत जगणाऱ्या आणि साऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींबद्दल बोलण्याची तुमची कुवत नाही.’’
‘’तुम्ही आजही जातीवाद करण्यात मश्गुल आहात… देशाभिमान आणि राष्ट्राचं सन्मान याच्याशी तुमचं घेणंदेणं नाही आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं देखील तुम्हाला सोयंर राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी करा, त्यामध्ये औरंग्याचे गुणगाण गाणाऱ्यांवर टाळ्या वाजवा.’’ अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App