मुख्यमंत्र्यांची इरशाळवाडीला भेट; नागरिकांना प्रत्यक्ष भेटून दिला आधार!!


प्रतिनिधी

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळगड गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले. Chief Minister’s visit to Irshalwadi; Aadhaar met the citizens in person!!



तसेच ही दुर्घटना भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम ठिकाणी घडल्याने हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. सध्या एनडीआरएफची पथके याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असून त्यांच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेतला. तसेच हे मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी निर्देश दिले.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर उपस्थित होते.

Chief Minister’s visit to Irshalwadi; Aadhaar met the citizens in person!!

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात