विशेष प्रतिनिधी
नागपूर : Ladki Bahin Scheme राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा विधिमंडळात गाजली. आज (बुधवार, १० डिसेंबर) हिवाळी अधिवेशनादरम्यान या योजनेतील कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी केवायसी प्रक्रिया आणि बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिती तटकरे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत विरोधकांवर जोरदार पलटवार केला.Ladki Bahin Scheme
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य सरकारची एक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या पात्र महिलांकडून केवायसीची प्रक्रिया करून घेतली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर आज राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली.Ladki Bahin Scheme
जनतेचा पैसा आहे, हिशोब द्यावा लागेल
विधानसभेत या विषयावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेत मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल,” असा जाब काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विचारला.
विरोधकांनी संभ्रम निर्माण करू नये
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या पारदर्शकतेची बाजू मांडली. त्या म्हणाल्या, “नावनोंदणीसाठी सक्षम पोर्टल आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यात कोणताही गोंधळ झालेला नसून विरोधकांनी विनाकारण संभ्रम निर्माण करू नये.”
जयंत पाटलांचे आरोप, तटकरेंचे प्रत्युत्तर
निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का? ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवाई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडीशन योजनांमध्ये घेतले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावर पहिल्याच शासन निर्णयातच 2 कोटी 63 लाख लोकांची पडताळणी सुरू केली. इतर विभागतही आम्ही डेटा तपासतोय. ई-केव्हायसीचे धोरण आणले, असे प्रत्युत्तर मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
KYC का आणली? तटकरे म्हणाल्या…
केवायसीसाठी आता 13 कंडिशन टाकल्या आहेत. याआधी त्या नव्हत्या, असे जयंत पाटील यांनी पुन्हा सभागृहात नमूद केले. तर ”अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे. यासाठीच KYC आपण केली” अशी माहिती आदिती तटकरेंनी जयंत पाटील यांच्या आरोपावर उत्तर देताना सभागृहात दिली.
लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई
त्याचप्रमाणे ज्या पुरूषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले ती खाती तपासली जातील. या योजनेचा फायदा खरंच पुरुष घेत असेल तर नक्कीच कारवाई होईल, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले.
एकनाथ शिंदेंचा पटोलेंवर पलटवार
विरोधकांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक शैलीत उत्तर दिले. नाना पटोले यांना लक्ष्य करत शिंदे म्हणाले, “तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये. तुम्ही सुरुवातीपासून या योजनेला विरोध केला, म्हणूनच विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी तुमचा पराभव केला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील.”
दरम्यान, महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी मिळणार? या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सरकार आपल्या शब्दावर ठाम आहे. योग्य वेळ येताच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ नक्की देऊ.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App