अयोध्येतून मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; नाशिकच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; पण त्यानंतरही पावसाचा तडाखा

प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमधील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा आणि गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला. Chief Minister Shinde Inspectied of Damaged Farms of Nashik

अयोध्येच्या दौऱ्यावरून महाराष्ट्रात परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिला दौरा नाशिकचा केला. या दौऱ्यानंतरही अवकाळी पाऊस थांबला नाही. उलट सायंकाळनंतर नाशिक शहरासकट सर्व तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या परिसरांना अवकाळी पावसाने तडाखा दिला.

बागलाण तालुक्यातील मोसम आणि करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे, ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी, ८ एप्रिलला बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Chief Minister Shinde Inspectied of Damaged Farms of Nashik

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात