विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2-अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (9.77 किमी)’ सेवेचा शुभारंभ केला. ऑक्टोबर 2024 मध्ये आरे जेव्हीएलआर ते बीकेसी (12.69 किमी) मार्गाचा शुभारंभ झाला होता. ही देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो लाईन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कफ परेट पासून एकूण 33 किलोमीटरची याची लांबी आहे. या लांबी पैकी मागच्या काळात 13 किलोमीटर लांबीची सुरूवात करण्यात आली होती. आज नऊ किलोमीटरची लांबी सुरू करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भविष्य सज्ज होणाऱ्या मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेचा नवा अध्याय मेट्रोच्या माध्यमातून रचला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याच भविष्यवेधी मार्गक्रमणा तील एक मैलाचा दगड म्हणावा अशा मुंबई मेट्रो लाईन-3 सेवेच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला.
अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील बैठका
महाराष्ट्र पोलिस, कोस्ट गार्ड किंवा भारतीय नौदल, सर्वच अलर्ट मोडवर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या तिघांचीही नियमित एक्सरसाइज कायमच सुरू असते. युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे जे करणे आवश्यक आहे, त्या-त्या सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही बैठका घेत आहोत. अशा स्थितीला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अशा काळात वॉर बूक किंवा एसओपीचे योग्य पद्धतीने पालन केले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App