Chief Minister Fadnavis : ‘’आपण एक राष्ट्र आहोत म्हणून सहअस्तित्व आवश्यक; उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्रात सहकार्याची गरज’’

Chief Minister Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान; पर्यावरण रक्षणासाठी विघटनशील प्लास्टिक हेच भविष्य असल्याचं सांगितले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘बलरामपूर बायोयुग’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आज आपल्या पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर ‘बायोयुग’ हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड) हे समाधान आहे.”Chief Minister Fadnavis

सध्या वापरात असलेल्या प्लास्टिकपैकी 50 टक्के प्लास्टिक सिंगल यूज आहे. यावर बंदी असली तरी पर्याय उपलब्ध नसल्याने अजूनही त्याचा आवरणासाठी वापर होतो. आता पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड हे बायोडिग्रेडेबल पर्याय म्हणून आपल्यासाठी आशादायक आहे. त्याचबरोबर पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड तंत्रज्ञान हे साखर उत्पादनातील अतिरेक, किंमत व्यवस्थापन, या सर्व गोष्टी यातून मार्गी लावते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.



साखरीचे उत्पादन वाढले की किंमती घसरतात, निर्यात रोखावी लागते, परिणामी उद्योग अडचणीत येतो. अशा वेळी केंद्र सरकारकडून निर्यात कोटा दिला जातो, उत्तर प्रदेशलासुद्धा कोटा दिला जातो, पण त्यांच्याकडे पोर्ट नाही. महाराष्ट्राकडे पोर्ट असल्याने तो कोटा महाराष्ट्राला मिळावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपण एक राष्ट्र आहोत, म्हणून सहअस्तित्व आवश्यक आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्याची गरज आहे. सरकारी पाठबळाविना नवीन तंत्रज्ञान व्यवहार्य ठरत नाही, हे मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातही अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची तयारी दर्शवली. तसेच उत्तर प्रदेशात तुमच्या 10 युनिट्स आहेत, आता महाराष्ट्रातही यायला हवे”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना महाराष्ट्रात आमंत्रित केले. यावेळी बलरामपूर चीनी मिल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सरावगी, कार्यकारी संचालिका अवंतिका सरावगी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Chief Minister Fadnavis said cooperation is needed in Uttar Pradesh and Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात