मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधनात उलगडला मृद व जलसंधारण विभागाच्या निर्मितीचा घटनाक्रम
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे मृद व जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदावर निवड झालेल्या राज्यभरातील 601 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिताना संबोधित केले.Chief Minister Fadnavis
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2022 मध्ये राज्यात 75 हजार रिक्त पदांच्या भरतीबाबत महायुती सरकारने निर्णय घेतला. या भरती प्रक्रिया पारदर्शी व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने आयबीपीएस व टीसीएस या दोन नामंकित संस्थांची नेमणूक केली व नवीन नियमावली देखील लागू केली. यामुळे सुमारे 60 लाख उमेदवारांना पारदर्शी पद्धतीने परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली.
75 हजार रिक्त पदांच्या भरतीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता, मात्र सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षांमार्फत नियुक्ती पत्र देण्याचे काम होत असताना, ही संख्या 1 लाख 50 हजार पर्यंत पोहोचली. हा एक रेकॉर्ड आहे, कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या झालेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनात मृद व जलसंधारण विभागाच्या निर्मितीचा घटनाक्रम उलगडला. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच 2014 मध्ये विविध 14 योजनांचे एकत्रीकरण करून मृद व जलसंधारण विभागाच्या सिंगल कमांड अंतर्गत जलयुक्त शिवारसारखी अत्यंत प्रभावी योजना राज्य शासनाने सुरु केली, या योजनेमुळे राज्यात रब्बीची पेरणी सुमारे 7-8 पटीने वाढली व बागायती शेती क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवारसंबंधी मुंबई उच्च न्यायाल्याच्या अहवालात काय नमूद केले आहे, हे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला 6 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रांचे वितरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने’च्या वॉटरशेड पथदर्शकांचा सत्कार व भरती प्रक्रियेमध्ये विशेष योगदान देणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यावेळी मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव, आयुक्त, प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App