एकनाथ शिंदेंच्या कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांबरोबरच माध्यमांनाही टोला!!

Chief Minister Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्या कामाला स्थगिती या माध्यमांच्या लाडक्या बातम्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी विरोधकांना आणि माध्यमांना टोला हाणला. एकनाथ शिंदे यांच्या कामाला स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधक आणि माध्यमांचे वाभाडे काढले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले त्या भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांना आणि माध्यमांना देखील जोरदार चिमटे काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले :

भारतरत्न आंबेडकरांनी दाखवलेल्या संविधानाने मार्गाने चालण्याचा जनादेश लोकांनी महायुती सरकारला दिला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आपल्या सर्वांची दैवते आहेत गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरु आहे. १२ किल्ले हे हेरिटेज करण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात अतिशय आदरभाव असलेले हे सरकार आहे, आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला दाखले मागितले नाहीत.

सध्या माध्यमांची एक आवडती बातमी झाली आहे. काहीही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली ही एक पेड बातमी झाली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरिता मी उद्धव ठाकरे नाही. यापूर्वीदेखील मी सांगितलं आहे, जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरु करताना घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही आमच्या तिघांची आहे. ज्याठिकाणी काही गडबड आढळेल त्याठिकाणी चर्चा करुनच निर्णय होईल,” असं ठरवलं आहे. मात्र त्या खात्याच्या मंत्र्याने स्थगिती दिली तर फडणवीसांचा दणका, शिंदेंच्या खात्यांना स्थगिती दिली, अशा बातम्या येतात. क गोष्ट सांगतो, हे समन्वयाने चालणारे सरकार आहे.

दावोसमध्ये आपण 63 सामंजस्य करार केले,त्यांपैकी  निम्म्या प्रकल्पांवर काम सुरु आहे. जयंतराव तुमचा प्रोब्लेम आहे, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांसोबत चुकीच्या गोष्टी सांगतात. तुम्ही दादांचा ऐकत नाही तो तुमचा प्रोब्लेम आहे. रोहित पवार, वरुणने शंका व्यक्त केली, तर समजू शकतो मात्र तुमच्या सारख्या सरकारमध्ये काम केलेल्या नेत्यांनी राज्यातील गुंतवणुकीवर शंका उपस्थित करु नये.

महायुती सरकारने दावोसला जाऊनच का करार केले??, अशा टीका होतात. 2022मध्ये दावोसला कोण गेले होते?? आदित्य ठाकरे गेले होते ना… तिथे 80,000 कोटींचे करार केले. ते भारतीय कंपन्यांसोबतच केले आहेत. दावोसमध्ये फक्त महाराष्ट्राचीच चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे त्याकडे संकुचित बुद्धीने पाहू नका. महाराष्ट्रातील नेतेच गुजरात आघाडीवर असं म्हणतात, त्यामुळे त्यांनी प्रचारावर का खर्च करावा??

एचएसआरपी नंबर प्लेटचे दर आपल्या राज्यात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र इतर राज्यांच्या दरासोबत तुलना करुन आपण याचे दर ठरवले आहेत.यामध्ये एक कमिटी नेमून हे काम केले आहे.यासंदर्भात आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेस आणि लेट चार्जेस वेगळे दाखवलेत, आपण एकत्रित केले आहे. दुचाकीसाठी 420 पासून 480 पर्यंत आहेत, महाराष्ट्रात 450 आहेत तीनचाकीसाठी इतर राज्यांमध्ये 450 ते 550 आहेत.

Chief Minister Fadnavis hits out at the media as well as the opposition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात