महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सहकारी, नेते, पदाधिकाऱ्यांना सूचना
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह महायुतीचे मंत्री, आमदार, खासदारांसह पदाधिकारी उपस्थित होते. Chief Minister Eknath Shinde made instructions in the Mahayuti meeting to prepare for the Lok Sabha elections
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक आहे. तयारीला लागा, मतदारसंघात मोर्चेबांधणी करा. तर, यांनी तिन्ही पक्षात एकजुट ठेवा, समन्वय राखा, एकमेकांवर टीका-टिप्पणी टाळा. सत्तेत राहून सरकारविरोधात कुठलीही भूमिका घेऊ नका, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून अजित पवार गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत मंत्रालयासमोर केलेल्या आंदोलनावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी बोलून दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App