‘…त्यांनी शिवसैनिकांना कायम घरगड्यासारखी वागणूक यांनी दिली’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : ‘शिवसंकल्प अभियाना’तील सभा काल राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पार पडली. या सभेला संबोधित करताना विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय शिरसाट, आमदार संजय रायमूलकर, आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray he always treated the Shiv Sainiks like a housekeeper



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत, धनुष्यबाण टिकावा यासाठी दीड वर्षांपूर्वी आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे आज अनेक शिवसैनिक आमच्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी सोबत येऊन जोडले जात आहेत. शिवसेनाप्रमुख हे कार्यकर्त्यांना आपले मानायचे, तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे असं त्यांचं मत होतं. मात्र आजचे नेते मी आहे म्हणून तुम्ही आहात या मानसिकतेतून वागत आहेत. त्यामुळेच घरंदाज माणसाने घराणेशाहीवर बोलावे असे म्हणून त्यांनी सर्वसामान्य, गोरगरीब शिवसैनिकांचा जाहीर अपमान केला आहे.’

याशिवाय ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसशी यांनी सख्य केलं, सर्वसामान्य शिवसैनिकांवर अन्याय झाला तेव्हा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. शिवसैनिकांच्या व्यथा वेदना यांचं त्यांना काहीच वाटत नव्हते, उलट त्यांना कायम घरगड्यासारखी वागणूक यांनी दिली. अंगावर केसेस घेऊन, लाठ्या काठ्या झेलून पक्ष आम्ही शिवसैनिकांनी वाढवला त्यामुळे आमच्यावर टीका करताना तुम्ही पक्षासाठी नक्की काय केलं ते सांगा? ‘ असे जाहीर आव्हान दिले.

अयोध्येत राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचे धाडस मोदींनी दाखवले. तरीही आज त्यांच्यावर हे टीका करत आहेत, पण आगामी लोकसभेत हेच शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे यावेळी नमूद केले.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव- जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के हिस्सा राज्य सरकार देईल, लोणार सरोवर संवर्धनासाठी ३६९ कोटी रुपये आणि पेनटाकळी जलसिंचन प्रकल्पाला ५०० कोटी दिले आहेत, तसेच वैनगंगा- पैनगंगा नदीजोड योजनेला मंजुरी दिली जाईल असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray he always treated the Shiv Sainiks like a housekeeper

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात