बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार शिवसेना शिवतीर्थावर दरवर्षी दसरा मेळावा घेत असते. मात्र, सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून खरी शिवसेना कुणाची यावरून लढाई सुरू आहे. दरम्यान, यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असून त्यांना परवानगी मिळाली आहे. मात्र या दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ठाकरे गटावर घणाघात केला आहे. Chief Minister Eknath Shinde criticizes Thackeray group over Dussehra gathering at Shivaji Park
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, ”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.”
याशिवाय ”बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही.” असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
याचबरोबर ”आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल. कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?” अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App