‘’याक्षणी सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून…’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा!


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना सज्ज होण्याचे केले आवाहन.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘’राज्य आणि केंद्रातील विकासाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपल्याला पाठींबा केला असून तिन्ही पक्षांनी मिळून आता आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. याक्षणी सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून भक्कमपणे सरकारची वाटचाल पुढे सुरु आहे.’’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. Chief Minister Eknath Shinde claims the support of 210 MLAs to the government at the moment

नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात काल भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसैनिकांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

याचबरोबर ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाची वाटचाल सुरू असून देशविदेशातील त्यांना मिळणारा सन्मान हा भारतीय म्हणून आपली मान उंचावणारा आहे. राज्याच्या प्रगतीसाठी देखील केंद्राची आपल्याला भक्कम साथ मिळाली असून रेल्वेमार्ग उभारणी, पायाभूत सुविधा, नगरविकास यासाठी लागेल तेवढा निधी कोणतीही काटछाट न करता आपल्याला मिळत आहे.’’ असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक ममीत चौगुले, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी तसेच नवी मुंबईतील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Minister Eknath Shinde claims the support of 210 MLAs to the government at the moment

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात