मुंबई पोलिसांनी तपास केला सुरू
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई वाहतूक पोलिसांना एका पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला आहे. धमकी मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत आणि तपास सुरू करण्यात आला आहे.Devendra Fadnavis
धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असे सांगितले आहे. संदेश पाठवणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरील आहे हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. शिंदे यांची गाडी उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव आणि जेजे मार्ग पोलिस स्टेशन, सीएमओ आणि विविध मंत्रालयांसह अनेक अधिकृत ईमेल आयडींवर पाठवण्यात आला होता.
गोरेगाव पोलिस ठाण्याने या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, आरोपीने ईमेल पाठवल्याचे कबूल केले आहे. तेव्हापासून, मुंबई पोलिसांसह इतर तपास संस्था या धमकीमागील मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App